सोशल नेटवर्किंगवर नो प्रचार

Last Updated: Friday, January 27, 2012 - 22:12

www.24taas.com, मुंबई

 

फेसबुक, यू ट्युब, ट्‌विटर  सोशल नेटवर्किंग साईटस्‌वर प्रचारासंदर्भात मजकूर किंवा माहिती अपलोड राजकीय नेत्यांना करता येणार नाही. जर करावयाची असेल तर  राजकीय पक्षांनी आयोगाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे,  असे   निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष नीला सत्यनारायण यांनी स्पष्ट केले आहे.

 

फेसबुक, यू ट्युब, ट्‌विटर यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटस्‌वरील वैयक्तिक अकाऊंटवर अपलोड होणाऱ्या माहितीवर नियंत्रण ठेवणे अशक्‍य बाब असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने  दिले.  डिजिटल माध्यमांचा निवडणूक प्रचारासाठी वापर करण्यासंदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाने आतापर्यंत आयोगाशी संपर्क साधलेला नाही, असेही त्या या वेळी म्हणाल्या.

 

सध्या सोशल नेटवर्किंग साईटस्‌वापरणाऱ्यांची संख्या देशात कोट्यवधींच्या घरात आहे. केवळ मुंबईतच "फेसबुक'चा वापर करणाऱ्यांची संख्या ४३ लाखांच्या घरात आहे. यू ट्युब  आणि ट्‌विटरचा वापर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे प्रचारासाठी डिजिटल मीडियाचा वापर करण्याकडे राजकीय पक्षांचा ओढा आहे. काही राजकीय पक्षांनी  सोशल नेटवर्किंग साईटस्‌वर स्वतःची पेजेस तयार केली आहेत.  तर काहींनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ब्लॉगचाही वापर सुरू केला आहे.

 

First Published: Friday, January 27, 2012 - 22:12
comments powered by Disqus