राहुल गांधीः ‘युवराजा’ची वाट बिकट

विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलीटी म्हणजे महान शक्तींसोबत महान जबाबदारी येते. पण दुदैवाची गोष्ट म्हणजे हा प्रकार काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधीच्या बाबतीत लागू होत नाही..

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 4, 2014, 11:53 AM IST

विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलीटी म्हणजे महान शक्तींसोबत महान जबाबदारी येते. पण दुदैवाची गोष्ट म्हणजे हा प्रकार काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधीच्या बाबतीत लागू होत नाही.. पक्षात आणि संयुक्त पुरोगामी आघाडीत त्यांना भरपूर अधिकार आहे. पण जबाबदारीची गोष्ट येते तेव्हा ते ती पूर्ण करण्यात अपूर्ण पडत आहेत.
गांधी कुटुंबाचा वारसदार म्हणून त्यांनी अखेर राजकारणात सक्रिय होण्याचे आणि पक्षातील उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. एखादे मंत्रिपद घेऊन स्वतःला राजकारणी सिद्ध करायचे किंवा स्वतःला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करून २०१४ च्या रणसंग्रामाला पक्षाला घेऊन जाणे यासाठी त्यांना राजकीय पटल खुणावत होते. माणसाची सर्वात मोठी क्षमता ही त्याची कमजोरी ठरू शकते. राहुल यांच्या पुढे लागलेले गांधी हे आडनाव हे त्यांच्याकडे लक्ष वेधून गेणारे आहे. तसेच त्यांची दखल घेणार आहे. पण, तेच नाव त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे टाकणारेही आहे.
अनेक जण म्हणतात की राहुल गांधी हे चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले आहे. राजकारण हे त्याच्या गुणसूत्रात आहे. त्यांच्या डोक्यावर मुकूट आहे आणि यात काही शंका नाही. त्यांचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू, आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांना राजकीय घराणेशाही असतानाही त्यांनी पंतप्रधान म्हणून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. यंदा २०१४च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याची संधी होती, पण त्यांनी निवडणुकीची जबाबदारी राहुल गांधी यांच्या खांद्यावर दिली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे सांगितल्यानंतर २०१४मध्ये काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा सन-राईज होण्याचे सूतोवाच केले.
पण नरेंद्र मोदी नावाची लहर पाहता राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करणे घातक ठरले असते म्हणून त्यांनी राहुल गांधीचे नाव जाहीर केले नाही. तसेच काँग्रेस प्रणित यूपीए-२ सरकारवर एकानंतर एक असे अनेक संकट कोसळली, त्यात भ्रष्टाचाराचे आरोप, घोटाळे, कमकुवत धोरणे, महागाई आणि आर्थिक गोंधळ यांचा समावेश आहे. त्यामुळे मनमोहन सरकारला अनेक टीकांना सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करणे हे पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे झाले असते.
गांधी घराण्याने काँग्रेसचे नेतृत्व करणे ही काँग्रेसची गरज आहे. यापूर्वीचा इतिहास आहे, गांधी घराण्याने जेव्हा जेव्हा काँग्रेसची धुरा सांभाळली नाही, तेव्हा काँग्रेसची स्थिती वाईट झाली होती. राजीव गांधी यांच्या १९९१ ला झालेल्या हत्येनंतर सोनिया गांधी याने पक्षाची धुरा सांभाळण्यास नकार दिला. १९९६ मध्ये सीताराम केसरी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सपाटून मार खाल्ला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांना पुन्हा १९९७मध्ये काँग्रेसची धुरा सांभाळण्याची गळ घालण्यात आली. त्यानंतर काँग्रेसला उर्जितावस्था निर्माण झाली काँग्रेस आतापर्यंत सत्तेवर आहे.
काँग्रेस कार्यकर्त्याला वाटते की, राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करायला हवे होते. त्यामुळे यंगिस्तानची मते पारडयात पडली असती. पण २०१२मध्ये झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी निवडणुकीची धुरा सांभाळली परंतु त्यांना सपाटून मार खावा लागला होता.
सार्वत्रिक निवडणुकांनंतर राहुल गांधी यांनी एकतर सक्रिय विरोधीपक्ष नेता म्हणून भूमिका बजवावी किंवा सरकार आल्यास एकादे मंत्रिपद घेऊन आपली क्षमता दाखवावी. काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्यापेक्षा अधिक क्षमता असलेले नेते आहेत, परंतु त्यांच्या नावापुढे गांधी हे आडनाव नाही. राहुल गांधी काहीच करत नाही असे आरोप आपण करू शकत नाही. त्यांनी २०१४ च्या निवडणुकांसाठी कंबर कसली असून देशाच्या कानाकोपऱ्यात सभांचा धडाका लावला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.