शरद पवार : घड्याळाच्या काट्याची दिशा कोणाकडे?

लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असली तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका अजूनही अस्पष्ट दिसून येत आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 4, 2014, 12:12 PM IST

लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असली तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका अजूनही अस्पष्ट दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांसोबत मांडीला मांडी लावून बसणारे शरद पवार, मोदींचं गुणगाण करतांनाही दिसून आले आहेत.
मात्र या दरम्यान त्यांची नजर पंतप्रधानपदावर टीकून आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राजकीय परिस्थिती कशी असेल, परिस्थिती कशी निर्माण होईल, यावर घटनाक्रमावर पवारांचं लक्ष आहे.
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे अध्यक्ष आहेत.
शरद पवार, तारिक अन्वर आणि पीए संगमा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. हे तीनही राजकारणी आधी काँग्रेस पक्षात होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेचं मुख्य कारण हे होतं की, शरद पवार, तारिक अन्वर आणि पीए संगमा यांचा सोनिया गांधी यांना विरोध होता, आणि हा विरोध सोनिया गांधी या मूळच्या इटलीच्या आहेत, परदेशी आहेत म्हणून होता.
सोनिया गांधी परदेशी असल्याच्या मुद्यावरून 20 मे 1999 रोजी शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, आणि 25 मे 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरद पवारांनी स्थापना केली.
शरद पवार यांनी संरक्षण मंत्रीपदही भूषवलं आहे, त्यांनी म्हाडामधून लोकसभा निवडणूक लढवली होती.
शरद पवार हे 2005 ते 2008 या काळात बीसीसीआयचे अध्यक्षही होते, 2010 मध्ये शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाले, आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शरद पवार यांनी 1967 मध्ये केली.
यशवंतराव चव्हाण यांना शरद पवारांचे राजकीय गुरू म्हटलं जातं. 1978 मध्ये जनता पार्टीच्या आघाडी सरकारमधून त्यांना पहिल्यांदा काँग्रेसने निलंबित केलं होतं. या आघाडीमुळे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. लोकसभेसाठी 1984 साली पहिल्यांदा ते बारामतीमधून निवडून आले होते.
1987 साली शिवसेनेचा प्रभाव वाढला, आणि त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1993 साली ते चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्रीपदी आले. हा काळ त्यांच्यासाठी सर्वात वादग्रस्त काळ ठरला.
2001 आणि 2002 दरम्यान त्यांच्यावर माफियांशी संबंध असल्याचा आरोप लागला. गहू घोटाळा आणि 2 जी स्पेक्ट्रम सारखे आरोप त्यांच्यावर लागत होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.