‘सामना’त काय लिहावे, गडकरींनी सांगू नये- राऊत

‘सामना’त काय लिहावे हे गडकरींनी आम्हांला सांगू नये, यासाठी बाळासाहेब आहेत. सामना’मध्ये यापूर्वी अनेकवेळा गडकरी यांच्याबद्दल चांगले लिहून आले आहेत. सामनातील प्रत्येक शब्द तोलून मापून वापला जातो.

Updated: Feb 23, 2012, 06:12 PM IST

www.24taas.com, मुंबई

‘सामना’त काय लिहावे हे गडकरींनी आम्हांला सांगू नये, यासाठी बाळासाहेब आहेत.  सामना’मध्ये यापूर्वी अनेकवेळा गडकरी यांच्याबद्दल चांगले लिहून आले आहेत. सामनातील प्रत्येक शब्द तोलून मापून वापला जातो. ज्या ठिकाणी टीका करायची त्या ठिकाणी टीका होणारच, पण आम्ही कौतुकही करतो, असे प्रत्युत्तर ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.

 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी झी २४ तासला दिलेल्या खास मुलाखतीत सामनातील लिखाणावर आक्षेप घेतला होता. सामनातील लिखाणामुळे युतीत कटूता निर्माण होत, असल्याची नाराजी गडकरी यांनी व्यक्त केली होती. त्यावर खुलासा देताना संजय राऊत यांनी गडकरींना प्रत्युत्तर दिले आहे.

 

मी काय मातोश्रीचा ऑपरेटर नाही- राऊत

बाळासाहेबांना फोन केला तर त्यांच्यापर्यंत जाऊ दिला जात नाही, या गडकरींच्या यांच्या गोप्यस्फोटावर बोलताना, राऊत म्हणाले, की गडकरींचा रोष नेमका माझ्यावर आहे, की मातोश्रीवर आहे. हे त्यांनी स्पष्ट करावे. त्यांचे फोन बाळासाहेबांपर्यंत पोहत नाही, याचा माझाशी काय संबंध मला समजत नाही. मी काय मातोश्रीचा ऑपरेटर आहे की, काय असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

 

सामनात काय लिहून येतं याकडे सर्व देशाचं लक्ष असतं. शिवसेना आणि भाजपच्या प्रचाराचा जो झंझावात निर्माण होतो, त्याला काही अंशी सामना जबाबदार असतो.  गडकरींनीही हे माहीत आहे. त्यांची जी टीका ही गैरसमजातून झाली असावी. सामनातून नितीन गडकरी आणि इतर नेत्यांविषयी मला नाही वाटतं की काही चुकीचं लिहून आलं असेल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

 

संबंधित व्हिडिओ

[jwplayer mediaid="54164"]

 

[jwplayer mediaid="54026"]

 

[jwplayer mediaid="54045"]