निवडणुकांमुळे खाजगी उड्डानसेवेला सुगीचे दिवस

निवडणुकीचे दिवस आहेत... त्यामुळे बरेच धंदे तेजीत आहेत. त्यापैंकीच एक व्यवसाय म्हणजे खाजगी विमानं आणि हेलिकॉफ्टर भाड्यानं देण्याचा... या व्यवसायाला सध्या सुगीचे दिवस आलेत, असं म्हणायला हरकत नाही.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 15, 2014, 02:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
निवडणुकीचे दिवस आहेत... त्यामुळे बरेच धंदे तेजीत आहेत. त्यापैंकीच एक व्यवसाय म्हणजे खाजगी विमानं आणि हेलिकॉफ्टर भाड्यानं देण्याचा... या व्यवसायाला सध्या सुगीचे दिवस आलेत, असं म्हणायला हरकत नाही.
कमी वेळात जास्तीत जास्त ठिकाणी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी नेत्यांना खाजगी विमानं आणि हेलिकॉफ्टरचा चांगलाच उपयोग होतो. गेल्या दोन वर्षांपासून तोट्यात चालणारे या व्यवसायाला निवडणुकांनी अचानक नवसंजीवनी दिलीय. खाजगी विमानं आणि हेलिकॉफ्टर्स वापरण्यात बाजी मारलीय ती भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी... मोदी यांनी यामध्ये आकाशभरारीत पहिला क्रमांक पटकावलाय तर राहुल गांधी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
देशभरात विमाने व हेलिकॉप्टर भाड्याने देणार्‍या जवळजवळ १३० कंपन्या कार्यरत आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर या व्यवसायात ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांच्या प्रचाराच्या काळात विमाने व हेलिकॉप्टरच्या भाड्यापोटी राजकीय नेते आणि त्यांच्या पक्षांकडून ३५० ते ४०० कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविली जातेय. अर्थात मागणी वाढल्यानं, विमानं आणि हेलिकॉफ्टर्सच्या भाड्यातही वाढ झालेली आढळून येतेय. ऐन वेळेस तातडीनं हवं असल्यासं त्यासाठी अधिक भाडं मोजण्याची तयारी राजकीय पक्षांची असते. साहजिकच विमानतळांना लँडिंग व टेक-ऑफ शुल्क आणि पार्किंग शुल्काच्या रूपाने मिळणारे उत्पन्नही वाढलंय.
एरव्ही, क्षमतेपुरताही वापर होत नसलेल्या विमान आणि हेलिकॉफ्टर्सच्या या भराऱ्या पाहून ;बिझनेस एअरक्राफ्ट ऑपरेटर्स असोसिएशन`नंही सुखावलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.