राहुल गांधी गरिबीची थट्टा करतात, मोदींचा हल्लाबोल

बीकेसीमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी माँ-बेटेकी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. या सरकारमध्ये कुठलंही उत्तर देण्याची हिंमत नाही, हे फक्त गरिबीची थट्टा करतात आणि राहुल गांधी गरिबीचं टुरिझम करतात, असा हल्लाबोल त्यांनी केलाय. मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली आणि भाषणात सुरुवातीलाच त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 21, 2014, 09:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बीकेसीमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी माँ-बेटेकी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. या सरकारमध्ये कुठलंही उत्तर देण्याची हिंमत नाही, हे फक्त गरिबीची थट्टा करतात आणि राहुल गांधी गरिबीचं टुरिझम करतात, असा हल्लाबोल त्यांनी केलाय. मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली आणि भाषणात सुरुवातीलाच त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.
काय म्हणाले नरेंद्र मोदी
> बीकेसीतील सभेत मोदींनी केली मराठीतून भाषणाला सुरूवात
> शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची काढली आठवण
> भाषणाच्या सुरूवातीलाच चैत्यभूमिला केलं नमन
> शिवसेनाप्रमुखांना जिंकून आदरांजली द्यायचीय
> काँग्रेसला खूप मोठ्या पराभव स्वीकारावा लागेल
> काँग्रेसच्या संपूर्ण इतिहासात काँग्रेसचं पतन झालं नसेल
> आमच्यासाठी भारत मातृभूमि आहे, काँग्रेससाठी `मात्र`भूमी
> देशाला मजबूत सरकारची गरज
> आई-मुलाच्या रिमोट कंट्रोलवर चालणारी सरकार नको
> देशाची प्रगती करण्याऐवजी गरिबीची व्याख्याच काँग्रेसनं बदलली
> राहुल गांधींसाठी गरीब म्हणजे टूअरिस्ट स्पॉट
> मुद्दाम गरीबांसोबत फोटो काढतात राहुल, हे पर्यटक आहे त्यांच्यासाठी
> मुंबई रेल्वेचं आधुनिकीकरण गरजेचं
> आगामी काळात रेल्वेचं आधुनिकीकरण करण्याचं मोदींचं आश्वासन
> मोदींचा रोजगार, वीज, रेल्वे सर्व विषयांना हात
> शेतकऱ्यांचा कैवारी म्हणवून घेता, पण शेतकऱ्यांसाठी काय केलं?
> केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांवरही मोदींची टीका
> तरुणांसोबत मोदींची सरळ बातचित
> 18 ते 28 वयोगटातील तरुणांना विशेष मार्गदर्शन

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.