वादग्रस्त वक्तव्यावरून राज ठाकरे गोत्यात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळमध्ये काल शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 8, 2014, 02:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळमध्ये काल शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.
`आत्महत्या हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं उत्तर नाही... नुसत्याच कसल्या आत्महत्या करताय? मरायचंच असेल तर मंत्र्यांना मारुन मरा` असं वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केलं. ते यवतमाळमध्ये मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते. आता या वक्तव्याची चौकशी होणार असल्यामुळे राज ठाकरे अडचणीत आलेत..

`यवतमाळमध्ये ४५०हून अधिक आदिवासी कुमारी माता आहेत. कंत्राटदार इथल्या आदिवासी मुलींना नोकरीचं आमिष देवून त्यांची फसवणूक करतात. यवतमाळच्या खासदार एक महिला आहेत, तरीही त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडली नाही` असंही यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.