राज ठाकरेंचं दुबईतल्या मॉल प्रकरणी भुजबळांना उत्तर

माझा दुबईत काय, जगात कुठेही शॉपिंग मॉल असेल, तर तो मी छगन भुजबळ फाऊंडेशनला मोफत देऊन टाकेन, असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं आहे.

Updated: Apr 22, 2014, 04:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
माझा दुबईत काय, जगात कुठेही शॉपिंग मॉल असेल, तर तो मी छगन भुजबळ फाऊंडेशनला मोफत देऊन टाकेन, असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं आहे. नाशिक लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्यावर आरोप केले होते.
यात राज ठाकरे यांनी दुबईत शॉपिंग मॉल टाकला, या मॉलला संपत्ती राज ठाकरेंनी कुठून आणली, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला होता, या आरोपाला राज ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.
तसेच माझ्या खऱ्या आरोपांमुळे छगन भुजबळ चवताळले आहेत, मी केलेले आरोप हे खरे आहेत, यामुळे त्याचं उत्तर हे छगन भुजबळांकडे नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. याचे पुरावे मी निवडणुकीनंतर शरद पवारांकडे देईन, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय.
मला जर कुणी एखादं प्रकरण काढण्याची धमकी देत असतील, तर मी ही तेलगी प्रकरण काढीन, असं राज ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत म्हटलं होतं, यानंतर छगन भुजबळांनी राज ठाकरे यांच्यावर आरोप केले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.