पुण्याच्या सभेत काय म्हणाले राज ठाकरे?

पुण्यात राज ठाकरे यांची आज लोकसभेच्या प्रचारार्थ सभा झाली, या सभेत राज ठाकरे काय बोलले, यातील काही महत्वाचे मुद्दे

Updated: Mar 31, 2014, 11:22 PM IST

पुण्यात राज ठाकरे यांची आज लोकसभेच्या प्रचारार्थ सभा झाली, या सभेत राज ठाकरे काय बोलले, यातील काही महत्वाचे मुद्दे
* संसदेत आवाज उठवण्यासाठी माझे खासदार पाठवायचेत - राज ठाकरे
* देशात आलं तर मोदींचं सरकार येईल - राज ठाकरे
* पुणं सगळं बकाल झालंय - राज ठाकरे
* काँग्रेसला उद्धवस्ता करा - राज ठाकरे
* महाराजांच्या स्मारकाला विरोध नाही, पण गड किल्ल्यांचे संरक्षण करा-राज
* शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं संवर्धन महत्वाचं - राज ठाकरे
* मी पाडण्यासाठी उमेदवार दिलेले नाहीत- राज ठाकरे
* निवडणूक आली की काँग्रेसवाले शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय काढतात-राज
* मुंबईतले भूखंड इतरांना विकले, बाळासाहेबांना एकही नाही - राज ठाकरे
* पवारांना एनडीएमध्ये घेऊ नये, हे बोलायला तुम्ही केवढे ?, उद्धवना टोला
* मात्र देश कठीण परिस्थितून जात असल्याने मोदींना पाठिंबा-राज
* मुंबई गुजराथींचं माहेर हे मोदींना बोलण्याची गरज नाही - मोदी
* मुंबई गुजराथी लोकांचं माहेर हे पटत नाही - राज ठाकरे
* नरेंद्र मोदींवर टीका नव्हती, तो मैत्रिपूर्ण सल्ला होता - राज ठाकरे
* मला कुणाचे मुखवटे घेण्याची गरज नाही - राज ठाकरे
* जे असतं ते मी उघड करतो, राज ठाकरेंचं स्पष्टीकरण
* मी मोदींबद्दल 2010 मध्ये काय बोललो, हा व्हिडीओ यू-ट्यूबवर आहे-राज
* गुजरातमधील भाजपचं काम शिवसेनेने नाही पाहिलं, मी जाऊन पाहिलं
* शिवसेनेला राज ठाकरे यांचा थेट इशारा
* या निवडणुकीत मी माझी अवकात दाखवेल - राज ठाकरे
* गडकरींनी निवडणूक न लढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता - राज ठाकरे
* मुंबईतले फ्लॉयओव्हर्स हे स्वप्न बाळासाहेबांचं, पूर्ण केलं गडकरींनी-राज
* नितिन गडकरी यांच्याबद्दलचं माझं मत नेहमीच चांगलं- राज ठाकरे
* पण जागांचं काय कसं करायचं यावर चर्चा केलीच नाही - राज ठाकरे
* चर्चेसाठी मुंडेंनी संपर्क साधला होता - राज ठाकरे
* एकत्र येण्यासाठी एक साधा फोन केला असता - राज ठाकरे
* युतीच्या चर्चेसाठी वर्तमानपत्र, चॅनेल्स माध्यमं होऊ शकत नाही - राज ठाकरे
* उद्धव यांच्या टाळीच्या वक्तव्याला राज ठाकरेंचं उत्तर
* फोन केला असता तर चर्चा केली असती - राज ठाकरे
* मनसेचा प्रचार नारळ पुण्यात फुटला
* राज ठाकरे यांची लोकसभेत पहिलीच प्रचार सभा
* शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांचा मनसेत प्रवेश

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.