राजनाथ सिंग होणार पंतप्रधान: शरद पवार

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकीत वर्तवले आहे.

Updated: Apr 24, 2014, 05:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकीत वर्तवले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी पंतप्रधान मोदी नव्हे, राजनाथ सिंह होतील. अशी भविष्यवाणी शरद पवारांनी केली आहे. यासाठी पवारांनी `एनडीएला बहुमत मिळाले नाही, तर इतर पक्ष मोदींनी विरोध करतील`, या शक्यतेचा आधार घेतला आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ही बहुमतापर्यंत पोहचणार नाही. २७२ चा आकडा गाठण्यासाठी त्यांना इतर घटक पक्षांची साथ लागणार आहे. पण या स्थानिक राजकिय पक्षांचा मोदींना विरोध असणार आहे. यात भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांची भूमिका महत्वाची असेल. राजनाथ सिंग यांची प्रतिमा चांगली असल्याने त्यांचीच वर्णी पंतप्रधानपदी लागेल.
याच वेळी अटल बिहारी वाजपेयींबद्दल बोलताना पवार म्हणाले की, वाजपेयी अल्पसंख्यकांबरोबर इतर मागास समाजाला घेऊन चालणारे होते. वाजपेयींकडे सुसंस्कृत आणि विनम्र व्यक्ती म्हणून बघितलं जातं. पण यात मोदी आणि वाजपेयींची तुलनाच होऊ शकणार नाही. अशा शब्दात पवारांनी मोदीं विषयी विरोध दर्शवला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.