पावळेचा पाणी पाष्टाक !

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा विजय आणि काँग्रेसचा पराजय...यानंतरच बोल... कोकणात कौलारु घरे असतात. पावसाच्या दिवसात उतरणीचा भाग संपतो त्याला पावळी म्हणतात. आणि चढणीचा भाग संपतो त्याला पाशीट म्हणतात. पाणी नेहमी उतरणीला असते.ते पावळीतून गळते. पण पाण्याने उलटा प्रवाह स्विकारला तर मालवणी भाषेत याच अतर्क्याला म्हणतात, पावळेचा पाणी पाष्टाक !

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 17, 2014, 11:35 AM IST

ऋषी देसाई, झी 24 तास
कोकणभूमी ही अतर्क मानली जाते. या मातीने नेतृत्व निवडताना केवळ निवडून दिलं नाही तर त्या नेतृत्वाला बालेकिल्ला बनवण्याचेही स्वातंत्र दिलं. नाथ पै- दडवंतेपासून ते अगदी नारायण राणेंपर्यत नेतृत्वाला सरजांमदार नाही ते राजा बनवणारा हा भूभाग. यावेळच्या लोकसभा निवडणूकीत विद्यमान खासदार डॉ. नीलेश राणेंचा पराभव करत सेनेच्या विनायक राऊतांनी एक लाख पन्नास हजारांची एक्कावनची दक्षिणा देत हा गड युतीला बहाल केला. नीलेश राणेंचा गेल्या पाच वर्षातला प्रत्येक गावातला संपर्क, कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांचे जाळे याउलट विस्कळीत झालेली शिवसेना, मोजकेच कार्यकर्ते, मतदानादिवशी काही ठिकाणी तर सेनेची टेबलही नव्हती.. तरीपण हा चमत्कार घडला.. कोकणात कौलारु घरे असतात. पावसाच्या दिवसात उतरणीचा भाग संपतो त्याला पावळी म्हणतात. आणि चढणीचा भाग संपतो त्याला पाशीट म्हणतात. पाणी नेहमी उतरणीला असते.ते पावळीतून गळते. पण पाण्याने उलटा प्रवाह स्विकारला तर मालवणी भाषेत याच अतर्क्याला म्हणतात, पावळेचा पाणी पाष्टाक !

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची घोषणा झाली आणि चिपळूणपासून ते बांद्यापर्यंत भगवे झेंडे आणि फटाक्यांनी वातावरण दुमदुमून गेले. नीलेश राणे यांना या निवडणुकीत ३,४३ हजार ३७ मत मिळाली तर शिवसेनेचे विनायक राऊत यांना ४ लाख ४३ हजार ८८ मत मिळाली. या निवडणुकीत सेनेचे डिपॉझीट जप्त करून दोन लाखानी काँग्रेसचा विजय होईल, असे दावे करण्यात येत होते. पण प्रत्यक्षात मात्र शिवसेनेनं १ लाख ५० हजार ५१चे मताधिक्याने घवघवीत विजय मिळवलाय. राऊतांचा हा विजय केवळ सिंधुदुर्गातल्या शिवसैनिकांसाठीच नाही तर संपूर्ण कोकणासह मुंबईतल्या शिवसैनिकांनाही संजीवनी देणारा ठरलाय.
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाने यावेळी बालेकिल्ल्यावर पुन्हा शिवसेनेने आपला भगवा घट्ट रोवलाय. राणेंचा गड असणा-या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावेळी विद्यमान खासदार नीलेश राणे यांना पराभव सहन करावा लागलाय.
विद्यमान उद्योगमंत्री नारायण राणे यांचे नीलेश यांनी कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत उमेदवारी पटकावून स्वत:चा विजय नक्की केला होता. शिवसेनेनही गत उमेदवार सुरेश प्रभू यांना उमेदवारी नाकारून विनायक राऊत यांना उमेदवारी दिली होती. मधल्या काळात जैतापूर, वेगवेगळे प्रकल्प, काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष, राणे विरुद्ध जुने काँग्रेस, राणे विरुद्ध केसरकर, राणे विरुद्ध शिवसेना असे वेगवेगळे संघर्ष झडत गेले. नारायण राणेंनी वेगवेगळ्या स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूकीत आमदार विजय सावंत, आमदार दीपक केसरकर त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, स्थानिक नेते पुष्पसेन सावंत, आमदार राजन साळवी, आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी थेट विरोधाची भूमिका स्विकारली होती. मागच्या निवडणुकीत सर्वजण हातात हात घालून लढूनही नीलेश राणेंना केवळ सुमारे 48 हजाराचे लिड मिळाले होते. यावेळी परिस्थीती पूर्णपणे बदलली होती. भास्कर जाधवांपासून ते थेट दीपक केसरकर सारेच राणेंच्या विरोधात होते. त्यात दीपक केसरकराची नाराजी ही उटांचा पाठीवरची काडी ठरली आणि जिल्ह्यात राजकिय उद्रेक पेटला. अनेक दिवस धूसमुसणा-या राजकीय असंतोषाला केसरकरांच्या रुपाने चेहरा मिळाला.. आणि शिवसैनिकाचा असंतोष, समाजवादी मताचा चेहरा आणि अंहिसावादी नेतृत्वा अशा सगळ्याच मताची मोट बांधली गेली.आणि गेल्यावेळी 48 हजाराचे लीड राखणे सोडाच यावेळी दीड लाखाचा पराभव पाहण्याची नामुष्की काँग्रेसवर आलीय.

मतमोजणीपूर्वी फक्त सावंतवाडीत फटका बसेल असा अनेक राजकिय विश्लेषकांचा होरा होता, पण प्रत्यक्षात विभागवार मतमोजणीचे आकडे आले आणि सगळ्यांनाच धक्का बसत गेला. सावंतवाडी मध्ये नीलेश राणेंना 47365 तर राऊतांना 88986 मते मिळाली. कुडाळ मालवण या नारायण राणेंच्या मतदारसंघात काँग्रेसला 52240 मते तर सेनेला 74123 मते मिळाली. कणकवली देवगडमध्ये फार मोठा चमत्कार होईल अशी आशा होती. पण प्रत्यक्षात मात्र शिवसेनेला 72641 आणि कॉंग्रेसला 71264 मते मिळाली. जैतापूर प्रकल्पाचा समावेश असलेल्या राजापूर मतदारसंघात राणेंना 55569 तर राऊतांना राऊतांना 77884 मते मिळाली. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या उदय