सचिनसाठी मतदान महत्वाचं मग, आयपीएल

Last Updated: Wednesday, April 23, 2014 - 17:15

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आधी मतदान करणार आहे. आणि मग आयपीएलसाठी दुबईला रवाना होणार आहे. मात्र या आधी आयफा अवॉर्डच्या सोहळ्यासाठी अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी अमेरिकेत जाणं पसंद केलं आहे.
खासदार सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झालेला असला, तरी आयपीएलमधील त्याचे मुंबई इंडियन्सबरोबरचे नाते कायम आहे. आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असली, तरी सचिन मतदानाचा हक्क बजावून पुन्हा दुबईला पुढील सामन्यासाठी जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा "आयकॉन` आहे. संघाच्या पहिल्या सामन्यापासून तो संघाबरोबर सरावही करीत आहे. परंतु, आता खेळण्याची जबाबदारी नसल्यामुळे त्याच्यावर सामन्याचे दडपण नाही.
लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील मतदानाचा टप्पा गुरुवारी 24 एप्रिल रोजी होणार आहे, तर मुंबई इंडियन्सचा पुढील सामना शुक्रवारी होणार आहे. सचिन उद्या मुंबईत दाखल होणार असून, गुरुवारी वांद्रे येथे मतदान केल्यानंतर तो पुन्हा दुबईला जाणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 23, 2014 - 17:15
comments powered by Disqus