मुंबईत शिवसेना-मनसेत रस्त्यावर जोरदार राडा

मुंबईतील जुने कस्टम हाऊसजवळ शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य़कर्ते एकमेकांना भिडलेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी एकमेकांना खुन्नस दिल्याने कार्यकर्ते हातातील झेंडे घेऊन तुटून पडले. यावेळी पोलिसांना न जुमानता कार्यकर्ते भिडलेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 3, 2014, 01:40 PM IST

www.24taas.com, झी मिडिया, मुंबई
मुंबईतील जुने कस्टम हाऊसजवळ शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य़कर्ते एकमेकांना भिडलेत. पोलिसांना न जुमानता राडा झाला. सोड्याच्या बाटल्या आणि दगड फेकत हाणामारीला सुरुवात झाली. त्यामुळे तणावाचे वातावरण दिसून येत आहे. यात दोन ते तीन कार्यकर्ते जखमी झाल्याचे समजते.
लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी एकमेकांना खुन्नस दिल्याने कार्यकर्ते हातातील झेंडे घेऊन तुटून पडले. यावेळी पोलिसांना न जुमानता कार्यकर्ते भिडलेत. या हाणामारीत दगड एकमेकांवर फेकण्यात आलेत. त्यामुळे तणावात अधिक भर पडली.
शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी मनसेचे उमेदवार आदित्य शिरोडकर हे ही आपला अर्ज भरण्यासाठी आलेत. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आलेत. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर वादाची ठिणगी पडली. एकमेकांना खुन्नस देताना आक्रमकपणा दिसून आला. यातून एकमेकांवर दगड, बाटल्या फेकण्याचा प्रकार घडला. तोही पोलिसांच्या डोळ्यादेखत. हा राडा रस्त्यावर आल्याने मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.