भारतीय नव्या सरकारसोबत काम करण्यास उत्सुक - ओबामा

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही नव्या सरकारचे वेध लागले आहेत. भारताच्या नव्या लोकनियुक्त सरकारसोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं ओबामांनी म्हटलयं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 13, 2014, 02:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही नव्या सरकारचे वेध लागले आहेत. भारताच्या नव्या लोकनियुक्त सरकारसोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं ओबामांनी म्हटलयं.
लोकसभा निवडणुका योग्यपणे पार पाडल्याबद्दल ओबामांनी भारतीय जनतेचं अभिनंदनही केलं आहे. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही निवडणूक यशस्वीपणे पार पाडून भारतानं जगासमोर आदर्श ठेवला आहे असंही ओबामांनी म्हटलंय.
दोन्ही देशातील संबंध अधिक चांगले होण्यावर आपला भर असेल, असं ओबामांनी स्पष्ट केलंय भारत आणि अमेरिकेची गेल्या दोन दशकांपासून घट्ट मैत्री असून येत्या काळात ही मैत्री अधिक घट्ट होईल असा विश्वास ओबामांनी व्यक्त केलाय.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही नव्या सरकारचे वेध लागले असल्याच्या प्रतिक्रियेचं भाजपनं स्वागत केलंय. आम्हीही अमेरिकेसह काम करण्यास उत्सुक असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते तरुण विजय यांनी दिलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.