सोनिया, राहुल गांधीही मोदींच्या शपथविधीला राहणार हजर

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये. सोमवारी म्हणजेच 26 मेला संध्याकाळी सहा वाजता मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाही निमंत्रित करण्यात आलं होतं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 24, 2014, 05:01 PM IST

www.24taas.com, पीटीआय, नवी दिल्ली
नरेंद्र मोदींच्या शपथविधीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये. सोमवारी म्हणजेच 26 मेला संध्याकाळी सहा वाजता मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाही निमंत्रित करण्यात आलं होतं.
मोदींचं हे आमंत्रण स्वीकारून सोनिया गांधी आणि राहुल गांधी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये.
नुकतंच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही या शपथविधीसाठी हजेरी लावणार असल्याचं जाहिर केलं आहे. त्यानंतर सोनिया आणि राहुलही येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी सार्क देशाच्या पंतप्रधानांनाही निमंत्रित कऱण्यात आलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.