मोदींच्या नावे लिहिली `सुसाईड नोट`

गाजियाबादहून जवळच असलेल्या लोनीमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका व्यक्तीनं आत्महत्या करण्यापूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावे एक `सुसाईड नोट` लिहून ठेवलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 22, 2014, 04:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मसुरी
गाजियाबादहून जवळच असलेल्या लोनीमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका व्यक्तीनं आत्महत्या करण्यापूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावे एक `सुसाईड नोट` लिहून ठेवलीय.
लोनीमध्ये राहणाऱ्या ओमप्रकाश तिवारी या ३५ वर्षीय गृहस्थाचं प्रेत सायंकाळी सुमारे साडे चारच्या सुमारास रेल्वे ट्रॅकवर आढळलं. या व्यक्तीनं आत्महत्या का केलीय यामागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.
धक्कादायक म्हणजे, ओमप्रकाशनं आपल्या मृत्यूपूर्वी नरेंद्र मोदींना उद्देशून एक चिठ्ठी लिहून ठेवलीय. यामध्ये त्यानं लिहिलंय, `प्रिय नरेंद्र मोदीजी... तुम्ही पंतप्रधानपदावर आरुढ होणार आहेात. मी माझ्या मुलीची जबाबदारी तुमच्यावर सोपवून जात आहे. गृह कलहामध्ये मी आत्महत्या करत आहे. यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये`
पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश एक कॅन्टीन चालवत होता. त्याचं त्याच्या पत्नीसोबत बऱ्याचदा भांडण व्हायचं. या जोडप्याला एक मुलगीही आहे. या किरकोळ भांडणांवरूनच त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा पोलिसांचा अंदाज आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.