`चिपळूणची कन्या` सुमित्रा महाजन नव्या लोकसभा अध्यक्ष

सुमित्रा महाजन नव्या लोकसभा अध्यक्ष महाराष्ट्राची कन्या सुमित्रा महाजन यांची बिनविरोध निवड

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 6, 2014, 02:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘चिपळूणची कन्या’ आणि भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांची सोळाव्या लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालीय. सुमित्रा महाजन भाजपच्या इंदौरच्या खासदार म्हणून निवडून आल्यात. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता.

या पदासाठी इतर कोणत्याही उमेदवारानं अर्ज दाखल न केल्यानं महाजन यांची बिनविरोध लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड झालीय. त्यामुळे, सुमित्रा महाजन या सलग दुसऱ्या महिला लोकसभा अध्यक्ष ठरल्या आहेत. पंधराव्या लोकसभेत मीरा कुमार यांची या पदासाठी निवड करण्यात आली होती. त्या पहिल्या लोकसभा अध्यक्ष ठरल्या होत्या.
गुरुवारी लोकसभेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, अन्नाद्रमुकचे नेते एम थंबीदुराई, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, सपाचे नेते मुलायम सिंह यादव, के. बी. महताब, एच डी देवेगौडा, सुप्रिया सुळे, मोहम्मद सलीम आणि जितेंद्र रेड्डी यांनी सुमित्रा महाजन यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.
72 वर्षीय सुमित्रा महाजन सलग आठ वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. त्यांनी सभापतींच्या पॅनलमध्ये दीर्घकाळ काम केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.