उदयनराजेंच्या वक्तव्यावर पवारांनाही हसू आवरेना!

By Shubhangi Palve | Last Updated: Saturday, April 5, 2014 - 20:39

www.24taas.com, झी मीडिया, सातारा
साताऱ्यातील उदयनराजेंचा शाही थाट काही औरच असतो... कितीही आणि काहीही बरळले तरी त्यांचा विजय हा इतरांनीही गृहीत धरलेला असतो... पण, यावेळी मात्र राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढणारे `राजे` थोडे धास्तावलेत की काय? असं प्रश्न उपस्थित झालाय.
त्याचं झालं असं की, साताऱ्यातील वाईमध्ये उदयनराजे यांच्या प्रचारासाठी एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या सभेला उपस्थिती लावली होती. यावेळी, उदयनराजेंनी आपला जाहीरनामाही जाहीर केला.
यावेळी, बोलताना उदयनराजेंनी `मला मंत्री बनवलं पण आता संत्री बनवू नका` असं म्हटलं... आता, हा टोला नक्की शरद पवारांना होता की हे जनतेला केलेलं आवाहन होतं, हे उदयनराजेच जाणोत.
एव्हढं मात्र खरं की, उदयनराजेंच्या या वक्तव्यानंतर साहजिकच समोरच्या उपस्थितांत हास्याचा पूर आला आणि त्यात शरद पवारही सामील झाले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 5, 2014 - 20:39
comments powered by Disqus