अमृता रायचा ईमेल आणि कम्प्युटर कुणी हॅक केला?

टीव्ही अँकर अमृता राय यांनी म्हटलंय की, माझा ईमेल किंवा कम्प्युटर हॅक करून, माझ्या जीवनातील खासगी बाब इंटरनेटवर टाकण्यात आली आहे.

Updated: Apr 30, 2014, 08:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
टीव्ही अँकर अमृता राय यांनी म्हटलंय की, माझा ईमेल किंवा कम्प्युटर हॅक करून, माझ्या जीवनातील खासगी बाब इंटरनेटवर टाकण्यात आली आहे.
अमृता रायने म्हटलंय हा भारतात सर्वाधिक मोठा गुन्हा आहे, माझ्या खासगी जीवनात डोकावण्यात आलं आहे, याचा मी तीव्र शब्दात निषेध करते.
67 वर्षांच्या दिग्विजय सिंहांच्या पत्नी आशा सिंह यांचं मागील वर्षी कन्सरने निधन झालं आहे.
यावर प्रतिक्रिया देतांना दिग्विजय सिंह यांनी म्हटलंय, अमृता रायशी असलेल्या रिलेशनशीपला स्वीकार करण्यास मला कोणताही कमीपणा वाटत नाही, अमृता राय यांनी आपल्या पतीशी फारकत घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
दिग्विजय सिंह यांनी पुढे लिहलं आहे, जेव्हा हे सर्व पूर्ण होईल, तेव्हा आपण हा संबंधांना औपचारिक रूप देऊ, मात्र माझ्या खासगी जीवनात डोकावण्याचा मी निषेध करतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.