मोदी मुसलमानांची टोपी का घालत नाहीत?

एएनआयला नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांना आपण कोणत्याही कार्यक्रमात तुम्हाला मुस्लिम टोपी घातली तर, तुम्ही ती का घालत नाहीत, असा प्रश्न विचारला, या प्रश्नाचं नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं आहे.

Updated: Apr 16, 2014, 09:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, गांधीनगर
एएनआयला नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांना आपण कोणत्याही कार्यक्रमात तुम्हाला मुस्लिम टोपी घातली तर, तुम्ही ती का घालत नाहीत, असा प्रश्न विचारला, या प्रश्नाचं नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, जर मी 2002 च्या निवडणुकांमध्ये पराभूत झालो असतो, तर तुम्ही मला हा प्रश्न विचारला नसता. मी गुजरात दंगलीत, मी म्हणजे मोदीने पाप केलं असेल, तर मोदीला भर चौकात फाशी द्या, त्याचे असे हाल करा की, पुढील शंभर वर्षात असं पाप कुणी करणार नाही.
यावर आणखी पुढे बोलतांना मोदी म्हणाले, नरेंद्र मोदी दोषी असेल तर त्याला माफ करू नका, टोपीच्या बाबतीत बोलायचं झालं तर, मी माझ्या परंपरांचं पालन करतो, आणि सर्वांच्या परंपरांचा सन्मान करतो, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना टोपी घालावी लागली नाही. जर मुसलामानांच्या टोपीशी कुणी छेडछाड करत असेल तर कारवाई झाली पाहिजे, मुस्लिमांच्या टोपीचं संरक्षण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.