अजित दादांचं मुंडेंना प्रत्युत्तर, ठाकरे बंधूंना सल्ला!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडेंच्या टीकेचा समाचार घेतला. `त्यांना पुतण्या सांभाळता आला नाही` त्याला आम्ही काय करणार असंही ते म्हणाले. तर दुसरीकडे "घरातले वाद घरात मिटवा तुमच्या वडे आणि चिकन-सुपनं देशाचे प्रश्न सुटणार नाहीत", असा खोचक सल्लाही अजित पवारांनी राज आणि उद्धव यांना दिलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 20, 2014, 06:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मनमाड
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडेंच्या टीकेचा समाचार घेतला. `त्यांना पुतण्या सांभाळता आला नाही` त्याला आम्ही काय करणार असंही ते म्हणाले. तर दुसरीकडे "घरातले वाद घरात मिटवा तुमच्या वडे आणि चिकन-सुपनं देशाचे प्रश्न सुटणार नाहीत", असा खोचक सल्लाही अजित पवारांनी राज आणि उद्धव यांना दिलाय.
"बारामतीची जनता मला भरभरून मतानं निवडून देते मग मी त्यांचे पाणी तोडण्याची भाषा कशी वापरेल. पुढे विधानसभेची निवडणूक आहे. विरोधक बनावट ऑडिओ क्लिपद्वारे मला बदनाम करण्याचं कारस्थान करत आहे. माणसं प्रेमानं आणि विकास कामानं जोडायची असतात. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करावी काय सत्य आहे ते समोर आणावं", अशी सावरसाराव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपबाबत केली. दिंडोरी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी ते नांदगाव इथं आले होते.
भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी काल येवला इथं झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कडाडून टीका केली होती. अजित पवार पैसे खातात, असा आरोपही मुंडेंनी अजित पवारांवर केला होता. त्यांच्याच या टीकेला उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. पाठिंब्यासाठी राज ठाकरेंकडे वल्गना करणाऱ्या गोपीनाथ मुंडेनी आमच्यावर टीका करू नये, असंही अजित पवार म्हणाले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.