शेवटच्या विकेन्डची संधी : प्रचारसभांना ऊत!

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या गुरुवारी म्हणजेच २४ तासखेला पार पडतंय. त्याआधीचा हा शेवटचा विकेन्ड असल्यानं सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून प्रचार सभांसाठी आणि दौऱ्यांसाठी तयार झालेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 19, 2014, 11:28 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या गुरुवारी म्हणजेच २४ तासखेला पार पडतंय. त्याआधीचा हा शेवटचा विकेन्ड असल्यानं सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून प्रचार सभांसाठी आणि दौऱ्यांसाठी तयार झालेत.
२४ तारखेला होणाऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीनं आता वेग घेतलाय. आज, शनिवार हा विकेन्डचा दिवस असला तरी सर्वच प्रमुख नेत्यांच्या आज सभा आहेत.
नाशिकमध्ये संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेणार आहेत तर उद्धव ठाकरेंची खेडमध्ये सभा होणार आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घाटकोपरमध्ये तीन सभा होणार असून नाशिक जिल्ह्यातल्या येवला आणि नांदगावमध्येही मुंडेंच्या सभा होणार आहेत. नाशिक जिल्ह्यातल्याच सिन्नरमध्ये शरद पवार आणि नारायण राणेंच्या सभा होणार आहेत.  

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.