भूतान आणि भारताची बाह्य-अंतर्गत ऊर्जा सुरक्षा

Last Updated: Tuesday, June 24, 2014 - 21:14
भूतान आणि भारताची बाह्य-अंतर्गत ऊर्जा सुरक्षा

हेमंत महाजन, माजी ब्रिगेडियर

नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत येऊन तीन आठवडे होता आहेत तोच ते स्वतः भूतान दौर्यावर गेले. एवढ्या तातडीने परदेश दौर्यावर जाण्याचे कारण काय? आणि त्यातही त्यांनी भूतानचीच निवड का केली? पंतप्रधानांच्या भूतान दौर्यामागे राष्ट्रहिताची आणि संरक्षणाची महत्त्वाची कारणे आहेत. शेजाराच्या देशांशी संबंध रसातळाला…

 

गेल्या दहा वर्षात आपल्या देशाचे शेजाराच्या देशांशी असलेले संबंध रसातळाला पोहोचले होते. नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगला देश, श्रीलंका, मालदिव आणि पाकिस्तान व चीन हे आपल्या अगदी शेजारचे देश आहेत. या देशांशी आपले संबंध गेल्या दहा वर्षात रसातळाला का गेले याची बरीच कारणे आहेत. परंतु त्याचा परिणाम म्हणजे वाढता दहशतवाद, खोट्या नोटा देशात येणे, ड्रग, अफू, गांजा यांसारखे अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची तस्करी इतकेच नाही तर मानवी तस्करीदेखील वाढली. या सर्व गोष्टींमुळे देशाच्या सुरक्षेला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला होता.


 

चीन पाकिस्तानचे सार्क देशात आक्रमण ज्या देशांशी आपले अतिशय चांगले पारंपरिक संबंध होते त्यांचे आता चीन व पाकिस्तान या देशांशी जास्त मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. चीन आणि पाकिस्तानने या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक ,व राजकिय अतिक्रमणे केलेली आहेत आणि त्यामुळे आपल्या देशाला धोका निर्माण झालेला आहे. म्हणूनच आपल्या सीमेलगतच्या देशांशी आपले संबंध चांगले करणे आवश्यक आहे. तरच देश सुरक्षित होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे अतिशय चांगल्या पद्धतीने जाणले आणि म्हणूनच त्या दृष्टीने पहिले पाऊल त्यांनी शपथग्रहण समारंभाच्या वेळी टाकले.

 

त्यांनी या समारंभाला सार्कच्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित केले. त्याचे पुढचे पाऊल म्हणून त्यांनी आपल्या शेजारील देशांचे दौरे करायला सुरुवात केली आहे आणि त्यासाठीच हा भूतान दौरा आहे. आव्हान चीनी ड्रगनचे… नरेंद्र मोदींनी भूतानचीच प्रथम निवड का केली? यामागेही काही महत्त्वाची कारणे आहेत. गेल्या काही वर्षात भूतानशी असणारे आपले अतिशय मैत्रीपूर्ण संबंध बिघडले होते. या देशात अनेक वर्षांपासून परंपरेने राजेशाही होती. तिथला राजा हाच राष्ट्रप्रमुख असायचा. हे राजे अतिशय चांगले असल्यामुळे त्यांनी स्वतःहून राजेशाही सोडून भूतानमध्ये लोकशाही आणण्याचा प्रयत्न केला. सहा वर्षांपूर्वी तेथे पहिल्या निवडणुका झाल्या आणि तेथे नवीन सरकार स्थापन झाले.

 

आता या घटनेचा भारतावर काय परिणाम झाला? तर राजे होते तेव्हा आपले अतिशय चांगले संबंध या देशांशी होते. मात्र नव्या सरकारने चीनशी संबंध वाढविणे सुरु केले. भूतान आणि भारत यांच्यामधील एका करारानुसार भूतानचे संरक्षण करण्याचा भार अथवा जबाबदारी भारताची आहे. त्यांचे परराष्ट्र धोरण देखील भारताच्या सल्ल्याने ठरत असते. अशा परिस्थितीत भूतानने चीनशी संबंध ठेवले तर ते आपल्याला त्रासदायक ठरणारे होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. * झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 21, 2014 - 12:38
comments powered by Disqus