... तर हे आहे ‘सनीपाजी’च्या फिटनेसंच रहस्य

‘ये ढाई किलो का हाथ…’ म्हणत व्हिलनला लोळवणारा सन्नी देओल आजही मसक्युलर मॅन म्हणून ओळखला जातो. कडक फिटनेसमुळे सन्नी ५७ वर्षांचा असूनदेखील चाळीशीतला वाटतो. पंजाबी असल्याने तो चांगलाच खवय्यादेखील आहे. पण खवय्येगिरीबरोबरच व्यायामही आवश्यक असल्याच तो आवर्जून सांगतो. त्याच्या या व्यायाम मंत्राबरोबरच डाएटबद्दल त्यानं त्याचं दररोजचं वेळापत्रकही शेअर केलंय... पाहुयात...

Updated: Dec 22, 2013, 06:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘ये ढाई किलो का हाथ…’ म्हणत व्हिलनला लोळवणारा सन्नी देओल आजही मसक्युलर मॅन म्हणून ओळखला जातो. कडक फिटनेसमुळे सन्नी ५७ वर्षांचा असूनदेखील चाळीशीतला वाटतो. पंजाबी असल्याने तो चांगलाच खवय्यादेखील आहे. पण खवय्येगिरीबरोबरच व्यायामही आवश्यक असल्याच तो आवर्जून सांगतो. त्याच्या या व्यायाम मंत्राबरोबरच डाएटबद्दल त्यानं त्याचं दररोजचं वेळापत्रकही शेअर केलंय... पाहुयात...
सनी म्हणतो...
- मी रोज सकाळी सहा वाजता उठतो आणि लिंबू-पाणी पितो.
- जीमला गेल्यानंतर कार्डियो एक्सरसाईज आणि वेट - लिफ्टिंग
- जीमनंतर टेबल टेनिस, स्क्वॅश खेळतो आणि भरपूर चालतो.
- दारू, सिगारेट हे सेवन अजिबात करत नाही.
- रोज न चुकता प्राणायम आणि योगा करतो.
- अर्धा तास स्विमिंग
- शाकाहार आहाराला प्राधान्य देतो, दुपारच्या जेवणात डाळ, भात, भाजी, चपाती, सॅलेड, कधी-कधी चिकन.
- संध्याकाळी ज्यूस पितो.
- रात्रीच्या जेवणात मोड आलेली कडधान्ये खातो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

कसं आहे हे यंत्र: पाहा व्हिडिओ