पळसाच्या पानावर चवदार जिलब्या मात्र ४

 पळसाच्या पानाला पानं ३ अशी म्हण मराठीत आहे, पण पळसाच्या पानावर येथे ४ जिलब्या मिळतात.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 21, 2017, 07:46 PM IST

मुंबई : पळसाच्या पानाला पानं ३ अशी म्हण मराठीत आहे, पण पळसाच्या पानावर येथे ४ जिलब्या मिळतात, या जिलब्या पातळ आणि चवदार आहेत, यासोबत वेगळा आणि अनोखा फाफडा आहे, तोही जाडजूड नाही, तोही पातळ आणि चटकदार.

आणि या पळसाच्या पानावर या ४ जिलब्या तब्बल १२० वर्षापासून खव्वय्यांना दिली जात आहे, शुद्ध तुपात तळलेल्या जिलेब्या चवदार आहेत, त्यांची खासियतच ही असल्यामुळे ते फक्त जिलब्या आणि फाफडाचं विकतात. 

उत्सवाच्या किंवा सुटीच्या दिवशी या दुकानावर रांगा लागतात. तेव्हा जरूर दक्षिण मुंबईत मुंबादेवीला गेले तर या पळसाच्या पानावरील ४ जिलब्या आणि फाफड्याचा आस्वाद जरूर घ्या.