३ सूत्र आणि १०० वर्ष जगू शकतात तुम्ही!

सध्याच्या जीवन शैलीनुसार १०० वर्ष जगणं खूप कठीण झालं आहे. पण योग, आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सा केल्यास प्रत्येक व्यक्ती १०० वर्ष जगू शकतो. सध्या योग जनसामान्यपर्यंत पोहचला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 6, 2013, 05:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्याच्या जीवन शैलीनुसार १०० वर्ष जगणं खूप कठीण झालं आहे. पण योग, आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सा केल्यास प्रत्येक व्यक्ती १०० वर्ष जगू शकतो. सध्या योग जनसामान्यपर्यंत पोहचला आहे. ऋषी मूनींचा हा वारसा जगातील स्तरावर पोहचविला जात असल्याचे योगगुरू बाबा रामदेव यांनी सांगितले.
रविवारी पतंजलि विद्यापीठाच्या अभ्युदय महोत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांनी योग, आयुर्वेदाचे वैज्ञानिक फायदे जगासमोर आल्याचे सांगितले.
पतंजलिने जगभरात योगचा शंखनाद केला आहे. एक असा काळ होता की आयुर्वेदाकडे देशातील जनतेची रूची नव्हती. परंतु, आता योग आणि आयुर्वेदने जगभरात प्रतिष्ठा प्राप्त केली आहे.