नियमित ताक पिण्याचे ५ मोठे फायदे

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे.

Updated: Mar 15, 2016, 11:54 AM IST
नियमित ताक पिण्याचे ५ मोठे फायदे title=

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे.

ताक पिण्याचे ५ मोठे फायदे :

१. आम्लपित्त : उन्हाळ्यात आम्लपित्त म्हणजेच एसिडिटीचा अधिक त्रास होतो अशा काळात ताकमध्ये काली मिरी आणि काळं मीठ एकत्र करून प्यायल्याने एसिडिटी बरी होते.

२. रोग प्रतिकार शक्ती : ताकमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यातील लॅक्टोज तुमच्यामधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे तुम्हाला अधिक उर्जा मिळते. 

३. कफ : कफची समस्या असेल तर ताकमध्ये ओवा टाकूण प्यावं. पोट साफ होण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लस्सीमध्ये पुदीना टाकूण प्यावे.

४. पचनक्रिया : ताक रोज नियमित प्यायल्याने पचनसंबंधित समस्या कधीच येत नाही. अधिक जेवन झाल्यास ताक पिल्याणे मोठा फायदा होतो. 

५. विटामिन : ताकमध्ये विटामिन सी, ए, ई, के आणि बी असतं. जे शरिरासाठी अधिक लाभदायक असतात. यामधून मोठ्या प्रमाणात पोषकतत्व मिळतात. यामुळे कॅलरीज आणि फॅट देखील कमी होतं.