बदाम हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त

एका संशोधनादरम्यान स्पष्ट झालं की, दररोज मुठभर बदाम खाल्ल्यास हृद्याचे आजार कमी होतात. बदाम खाल्ल्यानं हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह नीट होतो. 

Updated: Jul 2, 2014, 12:00 PM IST
बदाम हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : एका संशोधनादरम्यान स्पष्ट झालं की, दररोज मुठभर बदाम खाल्ल्यास हृद्याचे आजार कमी होतात. बदाम खाल्ल्यानं हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह नीट होतो. 

ब्रिटनमध्ये एश्टन विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले की, बदाम खाल्ल्याने रक्तात एन्टीऑक्सिडेंटची मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे रक्तप्रवाहात सुधारणा होते. 

संशोधनादरम्यान संशोधकांनी सांगितलं की, या तथ्याविषयी विचार करताना भूमध्य सागरी क्षेत्रात बदामचे भरपूर सेवन केल्यास ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. 
 
हे संशोधन एश्टन विद्यापीठतील बायोमेडिकल सायंसेसचे प्राध्यापक आणि स्कूल ऑफ लाईफ अॅन्ड हेल्थ सायसेंसमध्ये कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक हेलेन ग्रीफिथ यांनी केले आहे. 
 
संशोधकांनी संशोधनाच्या वेळी, स्वस्थ तरुण, वृध्द लोक आणि हृद्याचे आजार असलेले लोकांना एकत्र घेऊन बदाम खाण्याचा हा प्रयोग केला होता. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.