सदैव तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी खा ५ गोष्टी

वयोमनानुसार आपल्या शरीरामध्ये सतत बदल घडत असतात. त्याचा परिणाम आपल्या त्वेचेवरही दिसतो. ही जैविक आणि निश्चित प्रक्रिया आहे. परंतु शरीरावर सतत होणारे परिणाम थांबवून आपण लवकर येणाऱ्या वृद्धत्वापासून दूर राहू शकतो.

Updated: Nov 29, 2016, 04:34 PM IST
सदैव तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी खा ५ गोष्टी title=

मुंबई : वयोमनानुसार आपल्या शरीरामध्ये सतत बदल घडत असतात. त्याचा परिणाम आपल्या त्वेचेवरही दिसतो. ही जैविक आणि निश्चित प्रक्रिया आहे. परंतु शरीरावर सतत होणारे परिणाम थांबवून आपण लवकर येणाऱ्या वृद्धत्वापासून दूर राहू शकतो.

वृद्धत्व ही प्रक्रिया आपल्या नियंत्रणाबाहेरील आहे, जसे की कौटुंबिक इतिहास आणि तीव्र वैद्यकीय अटी आनुवंशिक घटकांवर आधारित आहेत. सकारात्मक जीवनशैली, निरोगी राहणे, ताजे अन्न खाणे, नियमित व्यायाम, धूम्रपान न करणे, मद्य सेवन न करणे, पुरेशी झोप घेणे या गोष्टी केल्यास लवकर वृद्धत्व येणार नाही.

तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी ५ गोष्टी

1.डाळींब: डाळींब हे अतिशय मृदू फळ असून ते लवकर वृद्धत्व येण्यापासून वाचवते. डाळींब आपल्या शरीरावर नवीन त्वचेची निर्मिती करते. डाळींबमध्ये  व्हीटामिन  सी, जीवनसत्व असल्यामुळे ते उन्हामुळे चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्यापासून रक्षण करते. तसेच अॅंटीऑक्सिडीकरण, विषाणूंवर मात करण्याची क्षमता डाळींबात आहे.

२. संत्री : संत्री या फळामध्ये मोठ्याप्रमाणावर  व्हीटामिन सी जीवनसत्व असल्यामुळे आपल्या त्वचेला सुंदर, ताजे आणि उजळ दिसण्यासाठी मदत करते.

३. ऑलिव ऑईल : जेवणात ऑलिव ऑईलचा वापर करा. कारण ऑलिव ऑईल त्वचेला ताजेपणा देण्यासाठी आणि निरोगी ह्रद्य ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे ऑलिव ऑईल आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

४. दही : दही हे आपल्या आरोग्यासाठी उपायकारक आहे. दही कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हीटामिन डी युक्त आहे. शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि स्नायूना बळकट करण्यासाठी दही उपयुक्त आहे. वयोमानानुसार उद्धवणाऱ्या आतड्याच्या आजारांवर मात करण्यासाठी आणि पचन संस्था सुरळीत ठेवण्यासाठी दही फायदेशीर आहे.

५. ब्लुबेरीज : ब्लुबेरीज हे फळ चवीला मधूर असून इतर फळांच्या तुलनेत त्यात अॅंटीऑक्सिडीकरण जास्त आहे. तसेच आरोग्य निरोगी ठेवण्याचे गुणधर्म ब्लुबेरीजमध्ये आहे. त्वचेच्या गंभीर आजारांपासून रक्षण करण्याचे कार्य ब्लुबेरीज हे फळ करते.