तुम्हाला माहित आहे तुमचे नखं आहे किती धोकादायक ?

जेव्हा आपण लहान असतो तेव्हा मोठ्यांकडून आपल्याला नेहमी एक सल्ला मिळायचा की, हाथ स्वच्छ धुवावे. नखे जास्त वाढू देऊ नका. पण हात धुतल्यानंतरही ते स्वच्छ होतातच असे नाही. तुमच्या नखांमध्ये बॅक्टेरिया असतात. काही बॅक्टेरिया हे हात धुतल्यानंतरही हातावर असतात.

Updated: Aug 26, 2016, 09:51 AM IST
तुम्हाला माहित आहे तुमचे नखं आहे किती धोकादायक ? title=

मुंबई : जेव्हा आपण लहान असतो तेव्हा मोठ्यांकडून आपल्याला नेहमी एक सल्ला मिळायचा की, हाथ स्वच्छ धुवावे. नखे जास्त वाढू देऊ नका. पण हात धुतल्यानंतरही ते स्वच्छ होतातच असे नाही. तुमच्या नखांमध्ये बॅक्टेरिया असतात. काही बॅक्टेरिया हे हात धुतल्यानंतरही हातावर असतात.

१. तुमची नखं ही बॅक्टेरियांचं घर आहे. नखांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया असल्यास त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतात.

२. १९८८ साली पेंसिलवानिया यूनिवर्सिटीचे डर्मेटोलॉजी डिपार्टमेंटने असा शोध लावला होता की, नखांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया असतात.

३. संशोधकांनी म्हटलं आहे की, कृत्रिम नखांमध्ये नैसर्गिक नखांपेक्षा अधिक बॅक्टेरिया असतात. हात धुण्याच्या आधीही आणि हात धुतल्यानंतरही.

४. कृत्रिम नखांमुळे हात व्यवस्थित धुतले जात नाही. बाल्टिमोरमधील जॉन होप्किंस रुग्णालयातील नर्सिंगच्या संशोधकांनी असं म्हटलं आहे की, फिंगरट्रिप बॅक्टेरियल सूक्ष्म जिवांणू हे नैसर्गिक नखं हे कृत्रिम नखांपेक्षा कमी प्रभावित होतात.

सागण्याचं तात्पर्य हे आहे की, अँटीबॅक्टेरियल साबणाने हात धुतला तरी तुमच्या हातावरील नखांमध्ये जंतू असतात. त्यामुळे नखं बारीक आणि स्वच्छ ठेवा.