रोज व्यायाम करा आणि हाडांचे आजार टाळा

Last Updated: Friday, December 6, 2013 - 18:56

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ओस्टियोपोरोसिस (हाडांचा आजार) या समस्येमुळे हाडे कमकवत होतात आणि त्यांच्या घनतेत घट होत जाते. त्यामुळे शरीराचा हाडांचा सापळा हा कमजोर होतो.
भारतात आठ पैकी एक पुरुष आणि तीन पैकी एक महिला या आजाराला बळी पडतात. एवढचं नाही तर या आजारामुळे भारत हा जगामध्ये सर्वात जास्त आघाडीवर आहे, असे मत किंग जार्ज मेडिकल कॉलेजचे (केजीएमसी) वरिष्ठ प्राध्यापक विनीत शर्मा यांनी व्यक्त केले.
ओस्टियोपोरोसिस या आजारामुळे पाठीचा कणा, हिप आणि मनगट यांच्या जोडणीत फॅक्चर होण्याचा अधिक धोका असतो. या आजाराचा जास्त प्रभाव हा ५० वर्ष पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींमध्ये दिसून येतो. कारण पन्नशीनंतर हाडे ठिसूळ होतात. या आजारामुळे रुग्णाला सहजपणे फॅक्चर होण्यास सुरुवात होते.
‘वर्ल्ड ओस्टियोपोरोसिस डे’ च्या निमित्ताने डॉ. शर्मा यांनी सांगितले, रजोनिवृत्ती झालेल्या महिलांमध्ये सामान्यता या आजाराचा धोका जास्त असतो. कारण की, त्यांच्या शरीरात महत्त्वपूर्ण हारमोन एस्ट्रोजनची कमतरता होण्यास सुरुवात होते. हे हारमोन कमी झाल्यामुळे हाडांची झिज होऊ लागते. त्यामुळे हाडांची निर्मितीस बाधा येते आणि आजार होण्यास सुरुवात होतो. त्यामुळे रोजच्या रोज व्यायाम केल्यास या आजाराला टाळू शकतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 6, 2013 - 18:56
comments powered by Disqus