पाठदुखी, कंबरदुखी तुमच्याही मागे लागलीय का?

दिवसातले तासन् तास एकाच जागेवर बसून राहिल्याचे परिणाम तुम्हाला रात्री बेडवर पाठ टाकताच जाणवतात.... होय ना... लहान वयातच पाठिची दुखणी पाठी लागतात. अशात वेळीच पाठिकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला त्याचे परिणाम दीर्घकाळापर्यंत भोगावे लागतात.  

Updated: Sep 20, 2014, 08:05 AM IST
पाठदुखी, कंबरदुखी तुमच्याही मागे लागलीय का? title=

मुंबई : दिवसातले तासन् तास एकाच जागेवर बसून राहिल्याचे परिणाम तुम्हाला रात्री बेडवर पाठ टाकताच जाणवतात.... होय ना... लहान वयातच पाठिची दुखणी पाठी लागतात. अशात वेळीच पाठिकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला त्याचे परिणाम दीर्घकाळापर्यंत भोगावे लागतात.  

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत शारीरिक हालचाल कमी होत असल्यामुळे लहान वयातच काही शारीरिक दुखणी मागे लागतात. पाठदुखी आणि कंबरदुखी हा त्यातीलच एक प्रकार आहे. पण नियमितपणे काही व्यायाम केल्यास कंबरदुखी टाळता येते. कसे करता येतील हे व्यायाम... चला पाहुयात...
 
- रोज कमीत कमी वीस ते पंचवीस उठाबशा काढाव्या. यामुळे कंबरेचा घेर वाढत नाही.  
 
- जमिनीवर पालथे झोपावे. पाय एकमेकांना चिकटून ठेवावे. हात खालीच सरळ रेषेत ठेवावे. हळूहळू फक्त कंबरेचा भाग वर उचलावा, खाली करावा. ही क्रिया पाच ते दहा मिनिटे करावी. यामुळेही कंबरेला पर्याप्त व्यायाम मिळतो.
 
- पाठीवर झोपावे आणि दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून वर उचलावे. पायांना हाताचा आधार देत एकदा डाव्या कुशीवर तर एकदा उजव्या कुशीवर वळावे. यामुळेही कंबरेचा घेर आटोपशीर राहतो. 
 
- जमिनीवर पाय फाकवून उभे राहावे. एकदा संपूर्ण शरीर उजवीकडे वळवावे तर काही वेळ त्या स्थितीत राहून नंतर डावीकडे शरीर वळवावे. हा व्यायाम हातात बॉल घेऊनही करता येतो. दोन व्यक्तींनी एकमेकांकडे पाठ करून वळून परस्परांकडे बॉल पास करण्याचा प्रयत्न केल्यास आपोआप हा व्यायाम घडतो. यामुळेही कंबर सडपातळ राहण्यास मदत होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.