वेलची खाण्याचे हे आहेत फायदे

मुंबई : सुखी वैवाहिक जीवनासाठी गरजेचे आहेत पती पत्नींमधील चांगले शारीरिक संबंध. यासाठी पुरुषांची लैंगिक क्षमता चांगली असणे विशेष गरजेचे आहे.

Updated: Mar 24, 2016, 03:05 PM IST
वेलची खाण्याचे हे आहेत फायदे  title=

मुंबई : सुखी वैवाहिक जीवनासाठी गरजेचे आहेत पती पत्नींमधील चांगले शारीरिक संबंध. यासाठी पुरुषांची लैंगिक क्षमता चांगली असणे विशेष गरजेचे आहे. ती नसेल तर अनेक समस्या उद्भवू शकतात. ती क्षमता वाढवण्यासाठी पुरुष अनेक उपायही करतात. पण, त्याचसोबत तुमचा आहार आणि तुम्ही करत असलेला व्यायाम या गोष्टी गरजेच्या आहेत. निसर्गात सापडणाऱ्या काही पदार्थांमुळे तुम्ही तुमची ही क्षमता वाढवू शकता. वेलची हा त्यातील एक पदार्थ. 

वेलचीचा साधारणतः केला जाणारा उपयोग म्हणजे एखाद्या पदार्थाला चांगला गंध आणण्यासाठी किंवा मुखवास म्हणून. मसाल्यातही वेलचीचा वापर केला जातो. वेलची दोन प्रकारची असते - हिरवी म्हणजेच छोटी वेलची किंवा मोठी वेलची. वेलची हे कामोत्तेजक औषध आहे ज्यामुळे माणसाची लैंगिक शक्ती वाढू शकते. नपुंसकेतवर वेलची हे उत्तम औषध आहे. 

कसे सेवन कराल?
दूधात वेलची घाला आणि ते दूध उकळा. दूध उकळल्यावर त्यात थोडे मध घाला. असे दूध रोज रात्री नियमीतपणे प्या. यामुळे पुरुषांच्या लैंगिक क्षमतेत वाढ होते आणि दाम्पत्याचे लैंगिक जीवन सुखी होते. 

तोंडात पडणाऱ्या कात्रींसाठी लाभदायक 
काहींना तोंडात कात्रे पडण्याची समस्या असते. त्यासाठी वेलचीची बारीक पूड तयार करुन त्यात कुटलेली खडीसाखर घाला. हे मिश्रण जिभेवर ठेवा. पण, रात्री हे खाऊ नका. त्यामुळे रात्रभक ढेकर येण्याची शक्यता असते. 

महिलांनो सावधान
महिलांनी मात्र याचे अधिक सेवन करू नये. कारण, यामुळे महिलांचा गर्भपात होण्याची समस्या भेडसावू शकते.