सी फूड खाल्ल्यानं मधुमेहाचा धोका कमी!

सी फूडमध्ये कार्बोहायड्रेट आणि कोलेस्ट्रॉल यांचं प्रमाण कमी असतं यामुळंच टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी असतो.

| Updated: Nov 23, 2013, 07:10 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सी फूडमध्ये कार्बोहायड्रेट आणि कोलेस्ट्रॉल यांचं प्रमाण कमी असतं यामुळंच टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी असतो.
अनेक लोकांना सी फूड खाणं खूप पसंत असतं. एका नव्या संशोधनात असा दावा करण्यात आला की, सी फूडचे सेवन केल्यानं निरोगी राहण्यासोबत टाईप-२ मधुमेह सारख्या आजारालाही टाळता येतं. जर तुम्हाला सी फूड खाणं पसंत असेल तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आनंदी करू शकते.
अथेन्स विद्यापिठानं नुकतंच एक नवं संशोधन केलंय. सी फूडमध्ये कार्बोहायड्रेट आणि कोलेस्ट्रॉल यांची मात्रा कमी असते. त्यामुळं सी फूड खाणारी व्यक्ती, टाईप-२ मधुमेहापासून वाचू शकते, असा निष्कर्ष या संशोधनातून स्पष्ट झालंय. अथेन्स विद्यापिठाच्या संशोधकांनी ११ वर्षांपर्यंत जवळपास २३,००० लोकांवर याची पडताळणी केली. त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला.
संशोधनात सहभागी झालेल्या लोकांकडून एक प्रश्नावली भरण्यात आली होती. या प्रश्नावलीत आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीची माहीती सांगायची होती. ज्या लोकांनी नियमीत सी फूडचे सेवन करत असल्याचं सांगितलं, त्यांच्या शरिरात चरबीचं प्रमाण जास्त आढळलं नाही आणि यामुळं त्यांच्यामध्ये टाईप-२ मधुमेहचा धोका कमी होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.