घाबरू नका! तणावाची समस्या अनुवांशिकही असू शकते

तुम्हाला तुमच्या जीवनात सतत तणाव जाणवत असेल तर घाबरू नका... कारण, एका नव्या संशोधनानुसार ही तणावाची समस्या अनुवांशिकही असू शकते, असं समोर आलंय.

Updated: Jan 13, 2015, 08:22 AM IST
घाबरू नका! तणावाची समस्या अनुवांशिकही असू शकते title=

न्यूयॉर्क : तुम्हाला तुमच्या जीवनात सतत तणाव जाणवत असेल तर घाबरू नका... कारण, एका नव्या संशोधनानुसार ही तणावाची समस्या अनुवांशिकही असू शकते, असं समोर आलंय.

एका संशोधनानुसार, कठिण काळात तणावाची समस्या वाढवणाऱ्या गुणसूत्रीय जोडीची ओळख पटवण्यात आलीय. म्हणजेच, व्यक्तीच्या अगोदरच्या पीढितून आलेली ही गुणसूत्रं व्यक्तीसाठी तणावासाठी कारणीभूत ठरतात. आपल्या मेंदूत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या या दोन गुणसूत्रांना सीओएमटी आणि टीपीएच-२ नावानं ओळखलं जातं. 
 
शोधाचे मुख्य लेखक कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाचे अनुसंधानकर्ता अर्मेन गोएनजियान यांच्या म्हणण्यानुसार, या शोधामध्ये आम्हाला तणाव वाढण्याची समस्या तसंच सीओएमटी, टीपीएच-२ गुणसूत्रांमध्ये महत्त्वपूर्ण संबंध  आढळून आलेत. हे गुणसूत्रचं मानसिक तणावाची समस्या वाढवण्याचं काम करतं. 

गोएनजियन यांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांमध्ये ही गुणसूत्रं आढळतात अशा लोकांमध्ये तणाव वाढण्याचा धोका जास्त असतो. या शोधामुळे मानसिक समस्यानं त्रस्त असलेल्या लोकांना उपचार आणि निदानासाठी जैविक आधार मिळू शकतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.