कडूलिंबाने वाढते रोगप्रतिकारक क्षमता

गेल्या काही वर्षांपासून कडूलिंब ही वनस्पती आपण औषधी वनस्पती म्हणून ओळखतो. पण आता सध्या अस्तित्वात असणारा जीवघेणा आजार म्हणजे कॅन्सरसाठी देखील कडूलिंब ही वनस्पती रामबाण ठरली आहे. तसे प्रयोगांती स्पष्ट झाले आहे. या वनस्पतीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

Updated: Aug 15, 2013, 03:36 PM IST

www.24taas.com झी मीडिया, नवी दिल्ली
गेल्या काही वर्षांपासून कडूलिंब ही वनस्पती आपण औषधी वनस्पती म्हणून ओळखतो. पण आता सध्या अस्तित्वात असणारा जीवघेणा आजार म्हणजे कॅन्सरसाठी देखील कडूलिंब ही वनस्पती रामबाण ठरली आहे. तसे प्रयोगांती स्पष्ट झाले आहे. या वनस्पतीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
कडूलिबांच्या पानामध्ये एक वेगळा असा गूण आढळला की, जो कॅन्सरसाठी तर आहेच पण शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतेसोबतच लढण्यासाठी सक्षम आहे. कडूलिंब हे शरीरासाठी लाभदायक आहे. कॅन्सरनेपीडित असलेल्या काही १७ रूग्णाचे कॅन्सरचे जीवाणू घेऊन त्याच्यावर अनेक प्रयोग करून पाहिल्यानंतर मिळालेल्या निर्ष्कषावरून या गोष्टीचा खुलासा करण्यात आला.
या शोधानंतर असे लक्षात आले की, कडूलिंबाच्या पानाचा वापर हा कॅन्सरचा विकास होण्यापासून रोखू शकतात. कडूनिमबवर प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञानी सांगितले की, प्रजनन प्रक्रियेवर वाईट प्रभाव टाकू शकते, पण आताचे शास्त्रज्ञांनी कडूलिंबाबाबतच्या गोष्टीला नकार दिला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.