चॉकलेट करतं नैराश्य दूर

व्हॅलेंटाइन्स डे निमित्त चॉकलेटचा खप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. चॉकलेटमुळे जाडेपणा वाढतो, त्यामुळे डाएटिंग करणारे लोक चॉकलेट खाणं टाळतात. मात्र चॉकलेटचे फायदेही बरेच आहेत. एका चॉकलेटमध्ये अनेक फायदेशीर तत्वं आढळतात.

जयवंत पाटील | Updated: Feb 13, 2013, 06:23 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन
व्हॅलेंटाइन्स डे निमित्त चॉकलेटचा खप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. चॉकलेटमुळे जाडेपणा वाढतो, त्यामुळे डाएटिंग करणारे लोक चॉकलेट खाणं टाळतात. मात्र चॉकलेटचे फायदेही बरेच आहेत. एका चॉकलेटमध्ये अनेक फायदेशीर तत्वं आढळतात.
चॉकलेट मनावरील नैराश्य दूर करतं. चॉकलेटवर संशोधन करणाऱ्या अमेरिकन केमिकल सोसायटीने असा रिपोर्ट दिला आहे, की चॉकलेटमधून निर्माण होणारी रसायनं माणसाची दुःख, ताण-तणाव, वैषम्य यांसारख्या भावनांवर प्रभावकारी ठरतात. यशिवाय चॉकलेटमधील कॅफिन आणि थियोब्रोमिन शरीराला ऊर्जा पुरवतं.
ऍग्रीकल्चर अँड फूड केमेस्ट्रीच्या रिपोर्टनुसार चॉकलेट शरीरात आवश्यक असणारं कोलेस्ट्रॉल निर्माण करू शकतं. त्यामुळे गोड चॉकलेट जरी जाडेपणा देत असलं, तरी त्याचसोबत ते नैराष्य घालवतं आणि शरीराला ऊर्जाही पुरवतं.