पाहा, कोणत्या वेळी किती पाणी प्यावं...

तुम्ही जेवढं जास्त पाणी प्याल तेवढं तुमच्या शरीरासाठी उत्तम... हे तर एव्हाना तुम्हाला माहीत झालंच असेल. पण, नेमकं किती पाणी प्यावं आणि कोणत्या वेळेस यामध्ये मात्र बऱ्याचदा गोंधळलेली स्थिती आढळते. 

Updated: Jun 10, 2015, 03:27 PM IST
पाहा, कोणत्या वेळी किती पाणी प्यावं... title=

मुंबई : तुम्ही जेवढं जास्त पाणी प्याल तेवढं तुमच्या शरीरासाठी उत्तम... हे तर एव्हाना तुम्हाला माहीत झालंच असेल. पण, नेमकं किती पाणी प्यावं आणि कोणत्या वेळेस यामध्ये मात्र बऱ्याचदा गोंधळलेली स्थिती आढळते. 

योग्य वेळी पाणी पिल्यानं शरीराला जास्तीत जास्त फायदा होतो... कसा ते पाहुयात...

- सकाळी उठल्या उठल्या दोन ग्लास पाणी पिल्यानं शरीराच्या अंतर्गत अवयवांना चालना मिळते. 

- आंघोळ करण्याअगोदर एक ग्लास पाणी घेतल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतो. 

- जेवणाच्या 30 मिनिटे अगोदर एक ग्लास पाणी पिल्यानं तुम्ही घेतलेलं जेवण सहज पचण्यास मदत होते.

- झोपण्याआधी एक ग्लास पाणी पिल्यानं हृदयविकाराचा धोका टळतो.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.