थंडीत आरोग्यवर्धक कोणती फळे खावीत?

आपला आहार ऋतूनुसार असावा. सध्या थंडीचा मोसम आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याला अत्यंत पोषक अशी फळे खावीत. प्रत्येक फळाचे गुणधर्म वैशिष्ट्यपूर्ण असते. ही फळे आरोग्यवर्धक आहेत.

Updated: Nov 19, 2016, 07:28 PM IST
 थंडीत आरोग्यवर्धक कोणती फळे खावीत? title=

मुंबई : आपला आहार ऋतूनुसार असावा. सध्या थंडीचा मोसम आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याला अत्यंत पोषक अशी फळे खावीत. प्रत्येक फळाचे गुणधर्म वैशिष्ट्यपूर्ण असते. ही फळे आरोग्यवर्धक आहेत.

चिंच : 
- पिकलेली चिंच मलावरोधही दूर करते. 
- पचन करणं, रुची वाढवणं हाही चिंचेचा औषधी गुणधर्म
- दारूची नशा उतरविण्यासाठी पिकलेली चिंच कोमट पाण्यात भिजवून, बारीक करावी आणि पाणी मिसळून त्यात थोडा गूळ विरघळून प्यायला द्यायचे. हृदयाची दाहकता, जळजळ कमी होते. 
- पाय मुरगळला असेल तर चिंचेची ताजी पाने उकळून घेऊन ती त्या जागी लावायची. लगेच परिणाम जाणवतो. 
- गळ्याला सूज आली असेल तर १० ग्रॅम चिंच घेऊन एक लिटर पाण्यात घालायची. त्यात थोडे गुलाबजल मिसळून त्या पाण्याने  गुळण्या कराव्यात.

आवळा :
- आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. 
- रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारा म्हणून जास्त ओळख 
- आम्लपित्त आणि अ‍ॅसिडिटी कमी होण्यास मदत. 
- आपळा पित्तशामक असतो. 
- केसांसाठी, डोळ्यांसाठी, त्वचेसाठीही फायद्याचा असतो.
- आवळ्यापासून च्यवनप्राशसारखी काही औषधेही तयार करतात
- वार्धक्य लांबवणं हे आवळ्याचं प्रमुख काम
- शरीराला टवटवीतपणा देतो, तारुण्य देतो. 
- प्रेग्नंटच्यावेळी स्त्रीला उलटी आणि मळमळ वारंवार होत असते. अशा वेळी आवळा सुपारी, कँडी तसेच सरबत घ्यावे.
- नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढते. 

 ऊस : 
- ऊस हा पित्तशामक आहे. 
- ऊस लघवीचे प्रमाण वाढवणारा असतो.
- मूतखडा वगैरे लघवीच्या संदर्भातले सगळे विकार ऊस दूर करतो. 
- शरीरातील सर्व विषाक्त पदार्थ धुतले जातात. 
- थंड गुणाचा आणि बलकारक असा ऊस असतो. 

बोरे : 
- बोरे अग्निप्रदीपक असतात. 
- चवीला रुचकर, पचण्यास हलके असते. ते मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, 
- वातदोषास कमी करते, जुलाब थांबवते
- या रानफळांमधून व्हिटॅमीन सी भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.