धूतलेल्या तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा, हे आहेत आश्चर्यकारक फायदे...

आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी प्रत्येक जण नेहमी काळजी घेत असतो. कोणी सनस्क्रीन लावतो, कोणी आंबे हळद लावतो तर कोणी दुधाची साय आणखी बरच काही. मात्र, धुतलेल्या तांदळाच्या पाण्याने आपला चेहरा टवटवीत होतो आणि त्वचेलाही फायदा मिळतो.

Updated: Dec 19, 2015, 02:30 PM IST
धूतलेल्या तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा, हे आहेत आश्चर्यकारक फायदे... title=

मुंबई : आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी प्रत्येक जण नेहमी काळजी घेत असतो. कोणी सनस्क्रीन लावतो, कोणी आंबे हळद लावतो तर कोणी दुधाची साय आणखी बरच काही. मात्र, धुतलेल्या तांदळाच्या पाण्याने आपला चेहरा टवटवीत होतो आणि त्वचेलाही फायदा मिळतो.

उकळलेल्या तांदळाचे पाणी आरोग्यासाठी जेवढे फायदेशीर आहे, तेवढेच हे त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. त्वचेच्या सुंदरतेसाठी जे लोक घरगुती उपाय करतात त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. आठवड्यातून एक वेळा आपला चेहरा तांदळाच्या पाण्याने धुवा.

तांदळाचे पाणी त्वचेचे सौंदर्य वाढवते
तांदळाच्या पाण्यामध्ये उपलब्ध असलेले प्रोटीन, व्हिटॅमिन आणि अँटी-ऑक्सीडेंटच्या परिपूर्ण प्रमाण यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो. 

त्वचा उजळ राहते. चेहऱ्याचे डाग आणि सुरकूत्या दूर होतात. याव्यतिरिक्त तांदळाचे पाणी चांगल्या प्रकारचे क्लींजर देखील आहे.

कसा उपयोग कराल?
- एक कप तांदूळ चांगल्या प्रकारे स्वच्छ करुन पाण्यात भिजवा.
- अर्ध्या तासानंतर जेव्हा तांदळात असलेले पोषकतत्त्व पाण्यात मिक्स होतील तेव्हा भांडे गॅसवर ठेवा आणि तांदूळ शिजवा.
- तांदूळ शिजल्यानंतर त्याचे पाणी काढा आणि गार होऊ द्या.
- मग हे पाणी हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर मसाज करा.
- मसाज केल्याच्या१० मिनिटानंतर तांदळाच्या पाण्यानेच आपला चेहरा धुवा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या.
- तुम्हाला तुमच्या त्वचेत तात्काळ फरक जाणवेल.

केसांसाठी फायदेशीर
त्वचेसोबतच केसांसाठी देखील तांदूळ फायदेशीर आहे. जर तुम्ही पातळ आणि कोरड्या केसांनी त्रस्त आहात तर तांदळाच्या पाण्याने केस धुवा. यामुळे केस धुतल्याने केस दाट आणि चमकदार होतील. तांदळाचे पाणी २० मिनिटे केसांला लावून ठेवा. नंतर शाम्पू आणि कंडीशनरने धुवा. केस सुंदर आणि चमकदार होतील. दरम्यान, उपाय करण्याआधी डॉक्टारांचा सल्ला घ्यावा.