मोड आलेला लसूण हृदयरोगावर उत्तम

Last Updated: Sunday, March 2, 2014 - 07:32

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

लसणाला आयुर्वेदामध्येही महत्त्व आहे. लसूण आरोग्यासाठी खूप उपयोगी आणि गुणकारी आहे.हृदयरोगावर लसूण रामबाण उपाय करते, हे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
मात्र, ही लसूण मोड आलेली किंवा अंकुरलेली हवी. ह्रदयरोग तज्ज्ञ सांगतात, रोज आहारात एक तरी लसणाची पाकळी हवी.
ताज्या लसणापेक्षा साठवून ठेवलेल्या लसणाला आलेले अंकूर किंवा अंकुरीत लसण यामध्ये अॅण्टीऑक्साईडची क्रिया जलद गतीने होते.
त्यामुळे अंकुरीत लसूण ह्रदयासाठी खूप लाभदायक होऊ शकते, असे अमेरीकातील `युनिवर्सिटी ऑफ लोव`चे मुख्य संशोधनकर्ता जॉग किम यांचे म्हणणे आहे. लसूण असलेले पदार्थ कोलोस्ट्रॉल, रक्तदाब कमी करण्यास मदत करतात, असे कीम टीमचे म्हणणे आहे.
जेव्हा लसणाच्या बीमधून निघालेल्या अंकुराबरोबर अनेक संयुगे बनतात. अंकुरीत फळे आणि धान्य यामध्ये अॅण्टीऑक्साईडची क्रिया जलद गतीने वाढत जाते.
ही क्रिया साठवून ठेवलेल्या लसणामध्ये पण होऊ शकते. ५ दिवसांनी अंकुरीत झालेल्या लसणात अॅण्टीऑक्साईडची क्रिया जेवढी जलद होते, तेवढी ताज्या लसणात होत नाही.
लसणाचा अभ्यास केल्यानंतर यावरचा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आलाय. जर्नल ऑफ अॅग्रीकल्चरल अॅण्ड फूड केमिस्ट्री या शोधनिबंधामध्ये अंकुरीत लसणाची अॅण्टीऑक्साईडची क्रिया वाढवण्याचा उपाय असू शकतो, असे कीम टीमने सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 1, 2014 - 14:51
comments powered by Disqus