ताणतणावापासून सुटका हवी ?...हे कराच, एकदम फ्रेश व्हाल!

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, December 11, 2013 - 17:57

www.24taas.com, वृत्तसंस्था , लंडन
तुम्हाला तणावापासून सुटका हवी असेल किंवा शारीरिक झीज भरून काढण्यासाठी तुमच्यासाठी एक साधा उपाय. केवळ ध्यानसाधना करा. बघा तुमचा ताण चुटकीसरशी निघून जाईल. तुम्ही नेहमीप्रमाणे ताजेतवाण व्हाल. तसेच ध्यानधारणेमुळे जनुकांवर चांगला परिणाम दिसून येतो.
याबाबत एका ध्यानसाधना करणाऱ्या व्यक्तींच्या गटाचा आणि एक अप्रशिक्षित नियंत्रित गट अशा व्यक्तीचा अभ्यास करण्यात आला. आठ तास ध्यानधारणा केल्यानंतर शरीरात जनुकीय आणि रेणवीय बदल घडून येतात. त्यात जनुकांचे नियंत्रण करणाऱ्या प्रणालीत बदल घडल्याने वेदनाकारक जनुकांचे आविष्करण होत नाही. त्यामुळे शारीरिक झीज किंवा ताणापासून मुक्ती मिळते.
ध्यानसाधणेमुळे वेदना निर्माण करणाऱ्या जनुकांचे आविष्करण कमी होऊन शारीरिक ताणापासून मुक्ती मिळते, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. विस्कॉन्सिन, स्पेन व फ्रान्स येथील संशोधकांनी केलेल्या नव्या अभ्यासानुसार जर ध्यानसाधना जाणीवपूर्वक केली तर जनुकांवर चांगला परिणाम दिसून येतो.
ध्यानसाधनेमुळे जनुकीय पातळीवर कुठले बदल घडून येतात याची सांगड घालणारे हे पहिलेच संशोधन आहे, असे सेंटर फॉर इनव्हेस्टिगेटिंग हेल्दी माइंडसचे संस्थापक रिचर्ड जे.डेव्हीडसन यांनी सांगितले. या शोधनिबंधाचे एक लेखक पेरला कालीमन यांनी स्पष्ट केलंय. ज्या जनुकांचे आविष्करण कमी झाले ती जनुके नेमकी अशी आहेत ज्यांना वेदनाशामक औषधेही लक्ष्य करीत असतात.
दोन गटातील लोकांमध्ये म्हणजे ध्यानसाधना अथवा ध्यानधारणा करीत होते आणि जे करीत नव्हते त्यांची जी जनुके तपासण्यात आली त्यात काहीही फरक नव्हता. परंतु ध्यानधारणा करणाऱ्या गटातच वेदनाशामक परिणाम हे जनुकीय पातळीवर दिसून आले. त्याशिवाय डीएनएमध्ये दुरुस्ती करणाऱ्या इतर अनेक जनुकांमुळे दोन्ही गटात काहीच परिणाम दिसला नाही. ध्यानधारणा करणाऱ्या व्यक्तींमध्ये काही जनुकेच नियंत्रित झाली आणि ताण, वेदना कमी झाली.
सायको एंडोक्रायनोलॉजी या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. ध्यानधारणा आणि वेदनेचे गणित या संस्थेत रेणवीय विश्लेषणाचे प्रयोग करण्यात आले. ध्यानधारणेमुळे किंवा मनाच्या एकाग्रतेमुळे वेदनाकारक लक्षणे असलेल्या व्यक्तींमध्ये नेमके काय फायदे होतात, हे या संशोधनात दाखवून दिले आहे.
वेदना निर्माण करणाऱ्या जनुकांचे आविष्करण किंवा त्यांचे काम थांबवले गेले तर आपोआपच शरीराच्या वेदना कमी होतात व ध्यानधारणेमुळे हे शक्य होते. तसेच हिस्टोन डिअ‍ॅसिटिलेझ प्रकारातील जनुके ही सुद्धा शरीरात वेदना नियंत्रित करीत असतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 11, 2013 - 13:01
comments powered by Disqus