बदाम आणि थंड पाण्यानं करा दिवसाची सुरुवात!

Last Updated: Saturday, August 23, 2014 - 07:55
बदाम आणि थंड पाण्यानं करा दिवसाची सुरुवात!

मुंबई : आपलं स्वास्थ्य चांगलं राहावं, यासाठी तुम्ही काय करत नाहीत... डायटिंग, व्यायाम आणि आणखीन बऱ्याच गोष्टी... पण, आम्ही तुम्हाला सांगतोय स्वस्थ राहण्याचा एका सोपा उपाय...

आपली प्रकृती ठणठणीत राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या दिवसाची सुरुवात थंड पाणी, बदाम आणि व्यायामानं करा. याचा परिणाम तुम्हाला संपूर्ण दिवसभर जाणवत राहील. विशेष तज्ज्ञांचंही हेच म्हणणं आहे. एका फिटनेस सल्लागार कंपनीच्या मते, उत्तम आरोग्यासाठी तुम्ही आणखी काही गोष्टी अंगिकारू शकाल... त्या पुढीलप्रमाणे... 

-    सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर अर्धा लीटर थंड पाणी प्या... रिकाम्या पोटी थंड पाणी पिल्यानं मेटबॉलिजम वाढण्यास मदत होते. 

-    अनुशापोटी सहा ते दहा बदाम खा. त्यामुळे, तुमच्या शरीरात काही इंजाइम्स तयार होतात जे मेटबॉलिजम वाढण्यात सहाय्यक ठरतात.

-    ब्रेकफास्ट करताना थोडा हेवी राहील, याची काळजी घ्या... त्यामुळे, दिवसभर तुम्हाला त्याची ऊर्जा मिळू शकेल. ब्रेकफास्टमध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतील याची काळजी घ्या.

-    यानंतर थोडा वेळ व्यायामासाठीही द्या. यामुळे तुमच्या मांसपेशीमध्ये लवचिकता कायम राहते आणि डिजनरेशनच्या प्रक्रियाही मंदावते.

-    मोकळ्या हवेत जेवढं फिरता येईल तेवढा जास्तीत जास्त फिरण्याचा आनंद घ्या. त्यामुळे, अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यात मदत मिळते. 

-    बदामात ऊर्जेची प्रचंड ताकद असते. दिवसातून थोडी थोडी शेंगदाणेही तोंडात टाकत राहा.

-    ध्यान आणि विश्रामावर लक्ष द्या. यामुळे, मानसिक शांती मिळते आणि तुमची विचारक्षमतेचाही विकास होतो.     

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Saturday, August 23, 2014 - 07:55
comments powered by Disqus