गोरेपणाचा मोह सोडा, तुम्ही सावळेच बरे!

Last Updated: Saturday, December 7, 2013 - 15:05

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुम्ही सावळे असाल तर मग चांगलीच गोष्ट आहे, हे आम्ही नाही सांगत तर वैद्यकीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे. वैद्यकीयदृष्ट्या सर्वात निरोगी त्वचा ही गव्हाळ किवा सावळ्या रंगाच्या व्यक्तीची असते. कारण यात मॅलनीन या रंगाद्रव्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे सूर्यप्रकाशात अतिनील किरणांपासून संरक्षणही होते. जर तुम्ही सावळे असाल तर उत्तम आहे.

पण अनेक व्यक्ती सावळेपणा घालवण्यासाठी बाजारातील विविध फेअरनेस क्रिम्सचा वापर करतात. त्या वापर टाळा आणि तुमची त्वचा निरोगी, टवटवीत कशी राहील यावर लक्ष केंद्रीत करा. महागड्या क्रिम वापरण्यापेक्षा घरगुती उपाय करुन देखील तुम्ही तुमचे सौदर्य अधिक चांगल्या प्रकारे टिकवू शकतात.
घरगुती उपाय :
 बेसन, हळद आणि दूध एकत्रीत करुन त्यात साधे मीठ घाला. त्यात खोबरेल किवा बदामाच्या तेलाचे पाच, सहा थेंब घाला नंतर हे मिश्रण चेहऱ्याला पंधरा मिनिट लाऊन नंतर चेहरा धुवा आणि पाहा तुमची त्वचा तेजस्वी दिसेल. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावे.
 त्वचेवरील काळे डाग घालवण्यासाठी लिंबाची साल ही चेहऱ्याला चोळा. हा उपाय दिवसातून दोनवेळा आणि आठवडा भर करावा.
 चेहऱ्यावर सुरकूत्या असतील तर आल्याचा रस कोमट करुन तो रात्री झोपताना चेहऱ्यावर लावा आणि सकाळी चेहरा स्वच्छ धुऊन खोबरेल तेल लावा. या उपायामुळे तुमची त्वचा तजेलदार दिसेल.

 चेहऱ्यावर मुरमे असल्यास कारल्याची साल चेहऱ्यावर चोळा. तसेच काळी वर्तुळे काळे डाग निघण्यास मदत होते. हा उपाय साधारण तीन, चार दिवस करा. त्यानंतर चेहरा उजळून दिसतो.

 बाजरीचे पिठाचा लेप केल्यानेही चेहरा चांगल्याप्रकारे उजळतो.
अशा प्रकारे आपण घरगुती उपाय करुन देखील चेहऱ्याची निघा राखू शकतो आणि चेहरा तेजस्वी करु शकतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हि़डिओFirst Published: Saturday, December 7, 2013 - 15:05


comments powered by Disqus
Live Streaming of Lalbaugcha Raja