सावधान! हिरव्या भाज्या खाल्ल्यानं होऊ शकतो कँसर

हिरव्या भाज्या आणि दूध आरोग्यासाठी चांगलं असतं हा आपला समज आहे, पण हे आता खात्रीलायक राहिलं नाही. शहरात विकले जाणारे हे पदार्थ आता कीटकनाशकांच्या साइड इफेक्ट्सचे बळी ठरत आहेत.

Updated: Mar 15, 2015, 02:19 PM IST
सावधान! हिरव्या भाज्या खाल्ल्यानं होऊ शकतो कँसर title=

कानपूर: हिरव्या भाज्या आणि दूध आरोग्यासाठी चांगलं असतं हा आपला समज आहे, पण हे आता खात्रीलायक राहिलं नाही. शहरात विकले जाणारे हे पदार्थ आता कीटकनाशकांच्या साइड इफेक्ट्सचे बळी ठरत आहेत.
शहरात विकल्या जाणाऱ्या भाज्यांच्या उत्पादनासाठी वापरले जाणारे कीटकनाशकं आणि दूषित पाण्यामुळं आपल्या मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळं मुलांना अनेक आजारांना सामोरं जावं लागू शकतं.  कीटकनाशके आणि दूषित पाण्याचा परिणाम गवतावरही दिसत आहे. त्यामुळं याचा अप्रत्यक्ष दुष्परिणाम प्राणांच्या दुधावर आणि थेट दुष्परिणाम मुलांवर होतो.
कृषि संरक्षण विभाग आणि भूमिसंरक्षण विभागानं या वस्तूस्थितीला दुजोरा दिला आहे. शेतातील गवत खाल्ल्यामुळं प्राण्यांचे दूध विषारी होत आहे. त्यामुळं किटकनाशकांचा शेतीतील सर्रास वापरावर आळा घालणं गरजेचं आहे. 
अहवालानुसार, त्वचा रोग, कँसर यांसारखे रोग यामुळं होऊ शकतात. त्यामुळं हे किती घातक आहे हे तुम्हाला समजू शकतं.