शेंगदाणा आरोग्यासाठी किती फायदेशीर

शेंगदाणा हा आरोग्यासाठी चांगला असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र अतिप्रमाणात खाणे टाळणे कधीही चांगलं. शेंगदाण्यात प्रथिनांचा मोठा स्त्रोत असलेले शेंगदाणे पित्तक्षामक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने ते महत्वाचे आहेत.

Updated: Sep 15, 2014, 06:00 PM IST
शेंगदाणा आरोग्यासाठी किती फायदेशीर title=

मुंबई : शेंगदाणा हा आरोग्यासाठी चांगला असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र अतिप्रमाणात खाणे टाळणे कधीही चांगलं. शेंगदाण्यात प्रथिनांचा मोठा स्त्रोत असलेले शेंगदाणे पित्तक्षामक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने ते महत्वाचे आहेत.

आतड्याचा(बृहदांत्र)कर्करोग टाळण्यासाठी, स्मरणशक्ती, तसेच हृदयाच्या कार्यात शेंगदाण्याती सत्व महत्वाची भूमिका बजावतात.

आतड्याचा(बृहदांत्र)कर्करोग टाळण्यासाठी शेंगदाणे महत्त्वाची भूमिका बजावतात. शेंगदाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात असलेले फॉलिक अॅसिड, फायटोस्टोरॉन, रेझव्हर्टरॉल आणि फायरीक अॅसिड हे कर्करोग विरोधी असल्याला अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे. 

आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा कच्चे शेंगदाणे खाणे कधीही फायदेशीर ठरते. त्यामुळे आतड्याचा कर्करोग २७ टक्क्यांपर्यंत टाळतो येतो. हे घटक असलेली औषधे खरेदी करण्यासाठी मात्र, मोठी रक्कम मोजावी लागते.    
  
शेंगदाणे हा उपकारक अशा अँटीऑक्सीडंटचा मोठा स्त्रोत आहे. हृदयाच्या कार्यात सातत्य ठेवण्यासाठी आणि हृदयाला संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी हे अँटीऑक्सीडंट महत्त्वाचे ठरतात.  जीवनसत्व बी ३चा स्त्रोत असलेले शेंगदाणे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज मुठभर शेंगदाणे खाण्यास काही हरकत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.