गळणाऱ्या केसांसाठी काही घरगुती उपाय

तुम्ही तुमच्या गळणाऱ्या केसांमुळे तुम्ही त्रस्त आहात का? तुम्हाला तुमच्या केसांची काळजी असेल तर हे उपाय जरूर करा.

Updated: Jul 22, 2015, 03:21 PM IST
गळणाऱ्या केसांसाठी काही घरगुती उपाय title=

नवी दिल्ली : तुम्ही तुमच्या गळणाऱ्या केसांमुळे तुम्ही त्रस्त आहात का? तुम्हाला तुमच्या केसांची काळजी असेल तर हे उपाय जरूर करा.

'ओशिया हर्बल' कंपनीच्या संस्थापक दिलीप कुंडलिया यांनी केस गळती थांबवण्यासाठी काही घरगुती टिप्स दिल्या आहेत.
केसांचा मसाज : रोजच्या रोज काही मिनिटांसाठी केसांना मसाज करा. यामुळं डोक्यातील रक्त प्रवाह नियंत्रित होण्यास मदत होते. डोक्यातील त्वचेला रक्त प्रवाह सुरळीत झाल्यास केसांची मुळं घट्ट होतात. केसांच्या मसाजसाठी खोबरेल तेलात दोन थेंब लिंबूचा रस टाका आणि एका तासानंतर शॅम्पूनं केस चांगले धुवा.
घरगुती हेयर स्पा : गरम पाण्यात ऑलिव्हचे तेल काही थेंब घाला आणि त्यात दोन मिनिटांसाठी टॉवेल भिजवून ठेवा. नंतर ह्या टॉवेलनं केसांना झाकून घ्या. हा एक प्रकारचा नैसर्गिक स्पा आहे.
नैसर्गिक रस : तुम्ही तुमच्या डोक्यातील त्वचेला लसूण, कांदा आणि आलं यांचा रस लावू शकता. हे रात्रभर लावून ठेवा आणि सकाळी केस धुवून टाका.
ओले केस विंचरू नये : केसांना मजबूत ठेवण्यासाठी ओले केस विंचरू नये, हे खूपचं उपयुक्त आहे. ओले केस विंचरल्यामुळं जास्त तुटतात. जर बाहेर जायची फारचं घाई असेल तरीही केस थोडे सुकवून नंतर ते विंचरा. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.