ब्लॅक टीचे १० आश्चर्यकारक फायदे

जगभरातील प्रत्येकाची सुरुवात सकाळच्या चहाने होते. चहा प्यायल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. चहामुळे सुस्ती, आळस दूर होतो. मात्र या चहाचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दुधाच्या चहाऐवजी ब्लॅक टी प्यायल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात. 

Updated: May 28, 2016, 12:33 PM IST
ब्लॅक टीचे १० आश्चर्यकारक फायदे title=

मुंबई : जगभरातील प्रत्येकाची सुरुवात सकाळच्या चहाने होते. चहा प्यायल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. चहामुळे सुस्ती, आळस दूर होतो. मात्र या चहाचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दुधाच्या चहाऐवजी ब्लॅक टी प्यायल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात. 

१. ब्लॅक टीचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

२. टी ट्रेड हेल्थ रिसर्च असोसिएशनच्या माहितीनुसार ब्लॅक टीमुळे तोंडात कॅव्हिटी निर्माण होत नाही तसेच दातांचे नुकसान होण्यापासून बचाव होतो. 

३. ब्लॅक टीमुळे हृद्याचे आरोग्यही चांगले राहते. 

४. ब्लॅक टीमध्ये पॉलिफिनॉल्स असते ज्यामुळे तंबाखू आणि इतर विषारी पदार्थांमुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो. 

५. ब्लॅक टीमध्ये असलेले पॉलिफिनॉल्ससारखे अँटी ऑक्सिडंट्स कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत होते. 

६. ब्लॅक टीमधील तत्वामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. 

७. डायबिटीजचा धोका कमी होतो. 

८. तणावापासून बचाव होतो. दिवसभराचा थकवा घालवण्यास ब्लॅक टी फायदेशीर आहे. 

९. ब्लॅक टीमुळे पाचनक्रिया मजबूत होते.

१०. अन्य पेयांच्या तुलनेत ब्लॅक टीमध्ये कॅफीनची मात्रा कमी असते. ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राखला जातो.