लवंग आरोग्यवर्धक, तिचे अनेक फायदे

Updated: Aug 26, 2014, 03:22 PM IST
लवंग आरोग्यवर्धक, तिचे अनेक फायदे title=

मुंबईः  लवंगचा घरगुती जेवणात वापर करण्यात येतो. हिच लवंग आरोग्यवर्धक असल्याचे स्पष्ट झाले आहे. लवंगचे अनेक फायदे आहेत.

अंगावर गोवर आल्यास दोन लवंग उगळून मधासोबत त्याचा लेप  काढावा. त्यामुळे अंगावरील आलेले गोवर लवकर बरे होते.

एक लवंग सकाळ-संध्याकाळ दोन वेळा जेवणानंतर चावून खल्यास आम्लपिताचा (अॅसिडिटी) त्रास होत नाही.

लवंग वाटून त्याचा लेप काढावा. त्यामुळे डोकेदुखी थांबते.

एक लवंग वाटून त्याची पावडर करावी आणि गरम पाण्यासोबत ती घ्यावी. दिवसात तीन वेळा हा प्रयोग केल्यास ताप लवकर उतरतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.