शांत झोप लागत नाहीय... हा प्रयोग करून पाहा!

वेळेअवेळी जेवण, कामाचा ताण यांसारख्या अनेक कारणांमुळे अनेक जणांना लवकर झोप न लागण्याची समस्या जाणवते. पूर्ण झोप न मिळाल्यानं अनेक आजार जडण्याचा धोका असतो.

Updated: Jan 5, 2017, 10:55 AM IST
शांत झोप लागत नाहीय... हा प्रयोग करून पाहा! title=

मुंबई : वेळेअवेळी जेवण, कामाचा ताण यांसारख्या अनेक कारणांमुळे अनेक जणांना लवकर झोप न लागण्याची समस्या जाणवते. पूर्ण झोप न मिळाल्यानं अनेक आजार जडण्याचा धोका असतो.

इतकचं नाही तर वेळेवर आणि योग्य तितक्या तास झोप मिळाली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या दिनचर्येवरही हा फरक दिसून येतो. यामुळे थकवा, डोळ्यांची जळजळ असे अनेक त्रासही जाणवू लागतात.

या समस्या टाळण्यासाठी एक साधा-सोप्पा उपाय तुम्हीही आजमावून पाहू शकता...

- सर्वात अगोदर आवाज करत जोरात तोंडानं श्वास सोडा

- तोंड बंद करून नाकानं हळू हळू श्वास घ्या

- त्यानंतर श्वासोच्छ्वास सात मोजेपर्यंत रोखून ठेवा

- त्यानंतर आठ मोजेपर्यंत तोंडानं श्वास सोडत राहा

- त्यानंतर पुन्हा श्वास घ्या

- हीच प्रक्रिया चार - पाच वेळा करत राहा

या श्वासोच्छ्वासाच्या प्रयोगामुळे हृदयाची धडधड कमी होते... आणि डोकंही शांत होण्यास मदत होते. सगळा थकवा, तणाव बाजुला सारून गाढ आणि शांत झोप लागण्यास यामुळे मदत होते.